नायगाव येथे एका युवकाने मोबाईलवर इतर धर्मियांच्या भावनाला ठेच पोहचेल असे आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने दोन धर्मियांच्या युवकांन मध्ये तेढ निर्माण होऊन सोमवारी रात्री 8 ते 9 च्या दरम्यान नायगाव पोलीस ठाण्यामध्ये शेकडोचा जमाव जमा झाला आहे
परिस्थिती हाता बाहेर जाणार असे चित्र निर्माण झाल्याने पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवून परिस्थिती नियंत्रणात आणल्याचा प्रकार घडला व वादग्रस्त पोस्ट प्रकरणी परस्पर तक्रारी वरून गुन्हा दाखल झाल्याचा प्रकार घडला आहे
नायगाव येथे हिंदू मुस्लिम यांच्यात मोबाईल वर आक्षेपार्ह पोस्ट टाकणे किंवा स्टेटस ठेवण्याचे प्रकार या पूर्वी अनेक वेळा घडले आहेत.येथील स्थानिक पुढारी माजी आ.वसंत चव्हाण व सामाजिक कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने ही प्रकरण मिटली आहे
या वेळी मात्र एका तरुणाने मोबाईलवर स्टेट्सच्या माध्यमातून चित्र विचित्र पोस्ट करून मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्याने या वरून नायगाव येथे बसस्थानक परिसरात वाद झाला.हे वृत्त कळताच वेळीच पो.नि.गुट्टे व स्थानिक पोलीस कर्मचारी यांनी प्रसंगावधान राखून मध्यस्थी करीत सर्वांना पोलीस ठाणे नायगाव येथे नेले.जमत जमत जमाव मोठ्या प्रमाणात जमला परिस्थिती हाता बाहेर जाते आहे
हे लक्षात आल्याने शेजारच्या रामतीर्थ,कुंटुर,व नांदेड हेड ऑफिस येथील अतिरिक्तपोलीस कुमक मागवली व जमावाला पांगवले दोन्ही धर्माच्या लोकांना समजावून ही सांगितले. व दोन्ही गटाचे तरुण परत गेले आहे
अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबीनेश कुमार व उपविभागीय अधिकारी अर्धापुर गौर हसन यांनी भेट दिली. परंतु याचा उपयोग झाला नाही शेवटी रात्री उशिरा मुस्लिम युवकांच्या तक्रारी वरुन सोमवारी रात्री उशिरा गुन्हा र.न.८९ भादवी २९५ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मंगळवारी गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त शहरात पसरल्या नंतर हिंदू धर्मीय तरुण मंडळीने मंगळवारी सकाळी नायगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक यांच्या कार्यालया समोर ठिय्या मांडला व काही पुरावे देऊन मुस्लिम तरुणांनी केलेले प्रकार दाखवून तक्रार दिली व गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
यावेळी पो.नि.गुटे यांनी उपविभागीय पोलीस अधीक्षक कसेकर बिलोली यांना संपर्क साधला त्या नंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबीनेश कुमार उपविभागीय अधिकारी कसेकर बिलोली,थोरात कंधार यांनी नायगाव ठाणे गाठले. त्यांनी अतिरिक्त पोलीस कुंमक मागवून जमावाला पांगवले नंतर हिंदू समाजाच्या कार्यकर्त्याची म्हणणे ऐकून तक्रार दाखल करून घेऊन गुन्हा दाखलकरण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे
गुन्हा र.न.९० भादवी २९५ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला..पुढील तपास पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुटे यांच्या कडे देण्यात आला असून सदर माहिती पोलीस जमादार सांगवीकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.
-------------------------------------------------------------------------
अतिरिक्त पोलीस कुंमक मागवल्याने नायगाव शहरात परिस्थिती नियंत्रणात -
दोन धर्माच्या युवकांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकून सोमवारी गुण्या गोविंदाने नांदत असलेल्या हिंदू मुस्लिम समाज बांधवात गढूळ वातावरण निर्माण केल्याने नं नायगाव शहरात हिंदू व मुस्लिम दोन धर्मीयांत तेढ निर्माण झाले होते.ही सर्व परिस्थिती आटोक्यात आली आहे
हाता बाहेर न जाऊ देता नायगाव व नांदेड पोलिसांनी व्यवस्थित हाताळली म्हणून विपरीत काही घडले नाही. आता नायगाव शहरात अतिरिक्त पोलीस मागवण्यात आली असून सर्वत्र परिस्थिती शांत व नियंत्रणात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ सांगितले आहे

0 Comments