नायगाव तालुक्याच्या ८९ गावात शेतकऱ्यांनी वरून राजाने पावसाला विलंब केला असला तरी शेतकऱ्याचा भर ६५ टक्के सोयाबीनवर असून ३५ टक्यामध्ये इतर पिके घेत असल्याचे सदरच्या शेतकऱ्यातून बोलल्या जात असून बऱ्याचपैकी शेतकऱ्यांनी शेतात आपल्या शेतीची मशागत करून पेरणीला चालू केली असली तरी अनेक शेतकरी पेरणीपासून वंचित असल्यामुळे या भागात शेतकऱ्यांसाठी मोठ्या पावसाची अपेक्षा आहे
तालुक्यासह ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी बऱ्याच पैकी गावात कोरड्या जमिनीवर सोयाबीन पेरले व अधून मधून थू वाऱ्यासारखा पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्याना दोन तरी दिवस मोठ्या पावसाची गरज असल्यामुळे शेतात केलेल्या पिकाची लागवड होणे शक्य होत नसल्यामुळे निसर्ग राजाचा जास्तीत जास्त पाऊस पडला तर शेतातील पेरलेल्या पिकाची उगवण चांगल्या प्रकारे होईल असे ही शेतकऱ्यातून बोलल्या जात आहे
ग्रामीण भागातील व खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन कापूस तूर मूग असे पिके घेत असून आमच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पूर्ण करण्यात आल्या नसल्या तरी शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने व बैलांच्या तिपणीने आज आप पेरण्या चालू ठेवल्या असल्याचे वास्तव चित्र ग्रामीण भागात दिसून येत असून कोरड्या जमिनीवर पेरण्यात आलेल्या सोयाबीनची उगवण बऱ्याच पैकी शेतकऱ्यांची झाली नसल्यामुळे त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट उद्भवले आहे आहे
खेड्यापाड्यात जोरदार पाऊस पडत नसल्यामुळे आजच्या परिस्थितीत नदी नाले विहिरी कोरड्याच आहेत अशाच पद्धतीचा जर पाऊस पडला तर जनावराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा उद्भवणार असल्याचे संकेत मिळत असून अद्याप तरी या भागामध्ये जोरदार पाऊस पडला नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे चित्र अवयास मिळत आहे

0 Comments