नायगाव तालुक्यातील बरबडा ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून दिलीपराव धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गावचे सरपंच माधवराव कोलगाने व उपसरपंच सौ छायाताई दिलीपराव धर्माधिकारी यांनी एक ते पाच वार्डात विकास कामाचा धुमधडाका उठविला असल्यामुळे सदरची ग्रामपंचायत विकासाच्या दिशेने जात असल्याने सरपंच कोलगाणे यांच्या कार्यप्रणालीवर गावकरी समाधान असल्याचे त्यांच्या विकासा कामा वरून दिसून येत आहेतालुक्यातील बरबडा येथील विद्यमान दिलीपराव धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली गावच्या विकासाला चालना देण्यासाठी सरपंच माधवराव कोलगाने व उपसरपंच छायाताई दिलीपराव धर्माधिकारी वतसेच ग्रामपंचायत कार्यालयाचे सर्व सदस्य प्रयत्न करीत आहे
ग्रामपंचायतने या पूर्वी सुद्धा यांच्या कार्यकाळात व सध्याच्या परिस्थिती मध्ये लाखो रुपयांचे कामे करण्यात आली व सध्या चालू असल्याचे वास्तव चित्र बरबडा गावात दिसून येत असले तरी सरपंच माधवराव कोलगाणे सदरच्या विकासाकडे जास्तीचे लक्ष दिले आहे
बरबडा ग्रामपंचायत कार्यालयाच्या अंतर्गत होत असलेल्या वार्ड क्रमांक एक मध्ये धनगर वस्ती सुधार योजने अंतर्गत दहा लाख रुपयाचे काम चालू करण्यात आले त्याच बरोबर फेव्हर ब्लॉगच्या कामाला सुरुवात करण्यात आली वार्ड क्रमांक दोन मध्ये दलित वस्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मशीन योजने अंतर्गत दहा लाख रुपयाचे काम यात चिखलमय होता
सरपंच माधवराव कोलगाणे यांनी लक्ष देऊन रस्त्यावर सीसी रोड करण्यात आला त्याच बरोबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत सी सी रस्ता पूर्ण करण्यात आला आहे
ग्रामपंचायत कार्यालयाच्या अंतर्गत वार्ड क्रमांक तीन मध्ये जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जन सुविधा विकास कामे चालू करण्यात आली यात मारोती गिरी यांच्या घरा पासून ते विभुते यांच्या घरा पर्यंत व गडपा यांच्या घरा पर्यंत त्याच बरोबर वार्ड क्रमांक चार मध्ये पंदराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून बंदिस्त नाल्या व बांधकाम सन २१ ते २२ सीसी रस्ता करण्यात आला आहे
वार्ड क्रमांक पाच मध्ये थेटे यांच्या गल्लीत सी सी रस्ता करण्यात आला व इतर कामे चालू असल्याचे ही दिसून आले आहे

0 Comments