Header Ads Widget

मेळगावात वाकलेला डीपी नागरिकांसाठी धोक्याची घंटा वेळीच अधिकाऱ्यानी लक्ष द्यावे

       माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे मेळगाव येथे गावाला विद्युत पुरवठा डीपी झुकल्यामुळे येत्या पावसाळ्यात जास्तीची झूकून खाली पडण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे गावकऱ्यासाठी धोक्याचा घंटा असल्याची भीती नागरिकात निर्माण झाली सदरचा डीपी व्यवस्थित करण्यासाठी विद्युत वितरण कंपनी युनिट कुंटूर यांनी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे गावकऱ्याचे म्हणे आहे 

तालुक्यातील मौजे मेळगाव येथील डीपी हा संपूर्ण गावाला विद्युत पुरवठा करतो तोच डीपी तात्काळ सरळ केला तर काही अनुचित प्रकार घडणार नाही यांची दखला विद्युत वितरणच्या अधिकाऱ्यानी घ्यावेत अशी मागणी नायागांव फास्ट न्यूजशी बोलताना नागरिकांनी केली असून विद्युत वितरण कंपनीचे कार्यालय अधिकारी कशासाठी दुर्लक्ष करीत आहेत असा ही प्रश्न नागरिकांनी उपस्थितीत केला आहे

मेळगावाला विद्युत पुरवठा करण्यासाठी सांगवी मेळगाव रोडवर सदरचा एकच डीपी असल्यामुळे डीपीचे व अधिकाऱ्याचे व्यवस्थान सुरळीत नसल्याने मागील ६ महिन्या पासून डीपी व खांब झुकलेला असल्यामुळे मेळगावचे नागरिक विज वितरण कंपनीच्या कार्यालयात मागच्या चार महिण्यापासून फेर फटका मारीत असताना सुद्धा अधिकारी लक्ष देत नसल्याचा ही आरोप नागरिकांनी केला आहे


Post a Comment

0 Comments