माधव पवार
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेस सोशल मीडियाच्या नायगाव विधानसभा अध्यक्षपदी लक्ष्मण खंडू कासराळे यांची तर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग संघटक पदी दिगांबर माणिकराव गंगासागरे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहेमहाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या विशेष उपस्थिती मध्ये नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील रहिवासी असलेले व अनेक दिवसापासून काँग्रेस पक्षात काम करणारे दिगंबर माणिकराव गंगासागरे यांची दिनांक १२ जुन २०२३ रोजी नांदेड येथे जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग संघटक पदी निवड करण्यात आली असल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहेतकाँग्रेस पक्षाचे संघटनात्मक बांधणी व पक्षांचा जनाधार वाढविण्याच्या आपल्या कार्याची दखल घेऊन जिल्हा काँग्रेस कमिटी कडून आलेल्या प्रस्तावानुसार आपली नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या संघटक पदी निवड करण्यात आली आहे
राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सिद्धार्थ हत्तिअंबिरें प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी गोविंदराव शिंदे नागिलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करून पक्षाची ध्येय धोरणे जनमानसात रुजून संघटना वाढीस बळ निर्माण होईल असा विश्वास काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राचार्य मनोहर पवार यांनी व्यक्त केला आहे
श्रीनिवास पाटील चव्हाण व प्रा. रवींद्र उर्फ बंडू पाटील चव्हाण यांचे कट्टर सर्मतक मारोती पाटील सुगावे यांच्या तरपे सत्कार करण्यात आला यावेळी साहेबराव पाटील सुगावे,जळबा पाटील सुगावे,भगवान पाटील सुगावे, शंकर माहारज मटपती, पंडीत पाटील सुगावे,मोहनराव जोगेवार,बालाजी तुरटवाड,माधराव कंचलवाड,देविदास पाटील सुगावे,आशोक पाटील सुगावे,कैलास पाटील सुगावे आदी वेळी उपस्थित होते यावेळी माधव पाटील सुगावे,कैलास पा.ढगे,धनराज पाटील ढगे,सभांजी पाटील सुगावे,सतिश पा.सुगावे, उमेश पा.सुगावे,आजिम शेख,विलास बोडंले, सुनिल सुगावे,सुरेश पा.ढगे,योगेश पा.सुगावे,उमेश सुगावे, आमोल सुगावे,आनंद सुगावे, दिपक बामने,मानस सुगावे, गणेश पांचाळ आदि उपस्थित होते
0 Comments