नायगाव फास्ट न्यूज : नांदेड राज्यात दिनांक २ जुन २०२३ रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला या परीक्षाच्या निकाला दरम्यान मोठया प्रमाणात मुलापेक्षा मुलीने बाजी मारली यात महात्मा फुले हायस्कूल नाईक नगर नांदेड एस.एस. सी. परीक्षेत ९५ % गुण मिळवून धनश्री बालाजी लामतुरे शाळेत प्रथम येण्याचा मान मिळविला आहे
नांदेडच्या महात्मा फुले हायस्कूल नाईक नगर या शाळेची कुमारी धनश्री बालाजी लामतुरे हिच्या घवघवीत यशाबदल शाळेच्या वतीने म्हणजे मुख्याध्यापक व शिक्षक वर्गानी तिचे कौतुक करुन अभिनंदन केले व शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यां कडून सुद्धा मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे

0 Comments