Header Ads Widget

सपोनी महादेव पुरी यांच्या निरोप समारोपात डॉ मोरे यांचा तिहेरी कौतुकास्पद सोहळा

नरसी : दिलीप वाघमारे - 

कुठल्याही क्षेत्र असो आपण वर्षभरात जे काम करतो तेव्हाच तेथील जनता आपल्या कार्याची पोचपावती व प्रोत्साहनचे हात पाठीवर फिरविते.याचेचं औचित्य साधून समाजातील अत्यंत महत्वाचे घटक असलेले नरसी येथील डॉ. संतोष मोरे यांनी पोलीस प्रशासनाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्या निरोप समारोपाचे आयोजन करण्यात आले होते

नरसीचे सरपंच व विविध क्षेत्रातील बाबीवर करडी नजर ठेवणारे चौथ्या आधारस्तंभ पत्रकार यांचे कार्य उल्लेखनीय असते.याहेतूने डॉ संतोष मोरे यांनी तिहेरी कौतुकास्पद सोहळा शुक्रवारी सायंकाळी नरसी येथे घडवून आणला आहे 
     
दरम्यान कुंटूर येथील सपोनी महादेव पुरी यांची बदली नांदेड येथे झाली.ते यापूर्वी रामतीर्थ पोलीस ठाण्याला देखील होते.तसेच दोन्ही ठाणे अंतर्गत त्यांचा कार्यकाळ हा कर्तव्यदक्ष व सक्षम अधिकारी म्हणून नेहमीच त्यांचे नाव चर्चेत राहिले.मात्र त्यांची बदली झाल्यामुळे नरसी येथील डॉक्टर संतोष मोरे यांनी शुक्रवारी सपोनी महादेव पुरी यांचा समारोप कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

परंतु योगायोगाने नरसी येथील नरसीचे सरपंच गजानन भिलवंडे व जेष्ठ पत्रकार सुभाष पेरकेवाड यांचा वाढदिवस होता.त्या अनुषंगाने डॉ संतोष मोरे यांनी तिहेरी संगम घडवून आणत त्यांनी तिघांचा सत्कार मोठ्या उत्साहात करत कौतुकास्पद सोहळा साजरा केल्याने सदरील लोकाभिमुख कार्यक्रमाची अनेकांनी स्तुती केली.
     
याप्रसंगी नरसीचे सरपंच गजानन उर्फ पपू भिलवंडे, सपोनी महादेव पुरी,जेष्ठ पत्रकार मनोहर तेलंग,आयोजक डॉ संतोष मोरे,मराठी पत्रकारसंघाचे तालुका सरचिटणीस दिलीप वाघमारे, नरसीचे शहराध्यक्ष गोंविद नरसीकर,तालुका उपाध्यक्ष गंगाधर गंगासागरे,शिवाजी पा. मोरे,चंद्रशेखर भिलवंडे, गोंविद नरवाडे,बाळू पाटील,व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणारे गजानन पाटील कांडाळकर,आणि मोरे हॉस्पिटलचे संपूर्ण स्टॉप उपस्थिती होती

Post a Comment

0 Comments