Header Ads Widget

कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात होत असलेल्या सत्काराने सपोनि विशाल बाहतरे यांनी वजीरगावात अक्षरशः बहारावले

             माधव पवार
नांदेड जिल्ह्यात एकूण ३६ पोलीस स्टेशन आहेत त्यापैकी की एक नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाणे असल्यामुळे या ठाण्यात येणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा सन्मान करण्यासाठी या विभागातील नागरिक उत्सुक असतात त्यामुळे कुंटूर पोलीस ठाण्याचा नुकताच पदभार सांभाळत असलेले सपोनि विशाल बहातरे यांच्या सत्काराने व माणसाच्या आपुलकीने अक्षरशः बाहरावून जात असून दिनांक २१ जुन २०२३ रोजी वजीरगावात ही सत्कार करण्यात आला आहे

नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल नागोराव बहातरे यांच्या भेटी घाटी घेण्यासाठी ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील कार्यकर्ते पोलीस पाटील तंटामुक्त अध्यक्ष सरपंच व उपसरपंच आणि विविध क्षेत्रातील मंडळी सपोनि बहातरे यांची पोलीस ठाण्यात भेट घेऊन चर्चा करत सदरच्या परिसराचा अभ्यास करुन देत असून वजीरगावच्या वतीने गावातील जेष्ठ व प्रतितिष्ठीत मंडळी सत्काराचे आयोजन करुन सत्कार करत आहेत

त्यावेळी आमदार राजेश पवार यांचे कट्टर समर्थक व भाजपा सोशल मीडिया तालुका उपाध्यक्ष हानमंत बालाजीराव ढगे, मा. सरपंच नागोराव पा.ढगे, मा. सरपंच बाबुराव पा. ढगे, मा.सरपंच प्रभू वाघमारे, मा पो.पा. उत्तमराव पा. ढगे मा. सदस्य आनंदा पा.ढगे, मारोती शंकरराव पा. ढगे, बाबुराव पा.ढगे,दिगंबर माने, रावसाहेब पा.ढगे, किशन पा.ढगे, आनंदा पा.ढगे, जेडी भाऊ ढगे, मुकदम हानमंत पा.ढगे, संजय पा.ढगे, बालाजी पा.ढगे, गोपीनाथ पा ढगे, शिवचरण पा.ढगे, बळी भाऊ ढगे आदी उपस्थित होते 

Post a Comment

0 Comments