यावेळी जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य के.जी. सूर्यवंशी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांनी नियमित योगासने करावे असे आवाहन यावेळी केले व विध्यार्थी टवटवीत राहण्यासाठी योग करण्याची अंत्यत गरज आहे
दिनांक २१ जूनला संपूर्ण जग योगा दिवस उत्साहाने साजरा करतो या दिवशी योगा बद्दल सर्वांना जागरुक करण्यासाठी विविध कार्यक्रम राबवले जातात
योग शिक्षक प्रा. ज्ञानेश्वर बैस व योग शिक्षिका प्रा. सौ. राजश्री कदम यांनी विद्यार्थ्यांना योगासनाचे धडे दिले या कार्यक्रमात जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी योगासने केली असून सदरच्या दिवसाचा आनंद सर्वत्र पसरला आहे

0 Comments