Header Ads Widget

बारूळ मनार प्रकल्प पाटबंधारे उपविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यात यावेत मा. शिवराज पाटील होटाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याशी करणार चर्चा

        माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातील बारूळ मनार प्रकल्पाचे कार्यक्षेत्र मोठे असल्यामुळे या विभागातील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यारी गेल्या अनेक महिन्यापासून सेवा निवृत्त झाले त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यानी रिक्त जागा भराव्यात म्हणून जिल्हाधिकाऱ्याची मा. शिवराज पाटील होटाळकर भेट घेणार आहेत

मनार प्रकल्प पाटबंधारे उपविभागातील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावेत या मागणी मा शिवराज पाटील होटाळकर यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत व पाट बंधारे विभाग नांदेड यांची भेट घेऊन करणार असल्याचे होटाळर यांनी सांगितले आहे 

भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह पाटबंधारे विभाग नांदेडच्या अधिकाऱ्याची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे होटाळकर यांनी सांगितले आहे
 
बारूळची प्रशासकीय यंत्रणा कमी पडत असल्यामुळे सदरच्या तळ्याचे पाणी शेतकऱ्यासाठी वेळेवर मिळत नाही कॅनल जागोजागी ना दुरुस्त असल्यामुळे बारूळ पासून ते सातेगाव बळेगाव इज्जतगाव पर्यंत पाणी सोडल्या जात नसल्यमुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे

मनार प्रकल्पाची निर्मिती १९६२ साली शंकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून झाली़ या निम्न मानार धरणाची लांबी १८६० मीटर असून उंची २६८२ मीटर असून प्रकल्पाला डावा व उजवा असे दोन कालवे आहेत़ डावा कालवा ६८ किलोमीटर तर उजवा कालवा २१ किलो मीटर अंतराचा आहे़

नायगाव पाट बंधारे विभागात सुद्धा अनेक रिक्त पद असताना सुद्धा या विभागातील अधिकाऱ्यानी भरत नसल्यामुळे कॅनलची अनेक ठिकाणी दयनिय अवस्था अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे झाली असल्यामुळे शासनानी तात्काळ रिक्त जागा भराव्यात या मागणीसाठी जिल्हाधिकारी व पाट बंधारे विभाग नांदेड यांची अर्जेंट भेट घेणार आहेत 



Post a Comment

0 Comments