नायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार राजेश पवार यांच्या माध्यमातून रुई बु येथे असलेल्या ओढ्यातील पुलांसाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून चार कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेतले असल्याची माहिती रुई बु.नगरीचे सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख यांनी नायगाव फास्ट न्यूजला दिली आहे
तालुक्यातील रुई बु व बळेगाव मार्गावर असलेल्या ओढ्यातील पूल अगदी जुना असल्यामुळे पावसाळ्यात त्या पुलावरून पाणी जात असल्याने ह्या मार्गावरील सर्व वाहतूक खोळंबली जाते ८९ विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार राजेश पवार यांनी सदरच्या ओढ्यातील पुलासाठी एकंदरीत चार कोटी रुपये मंजूर करून घेतले असून सदरचे काम सध्याच्या परिस्थितीत चालू जरी होत नसले तरी दीपावली पर्यंत सदरच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे
घुंगराळा ते बळेगाव रुई मार्गावर सदरचे पूल असल्यामुळे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या मार्गावरील नागरिकांना यंदाच्या पावसाळ्यात अडचणीचा सामना करावा लागणार असला तरी येथील दिवाळीच्या पूर्वसंध्येला सदरचे काम चालू होईल अशी अपेक्षा रुईचे सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख यांनी व्यक्त केली सदरच्या पुलासाठी चार कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्यामुळे या सुद्धा पुलांचा आमदार राजेश पवार यांच्या माध्यमातून वनवास संपणार आहे
दरवर्षी या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्यामुळे ओढ्या काठच्या लोकांच्या घरात अनेक वेळा पाणी शिरले होते गेल्या वर्षी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेश पवार यांनी घरात शिरलेल्या पाण्याची स्वतः रुई येथे येऊन पाणी सुद्धा केली होती सदरची गंभीर बाब लक्षात घेऊन सदरचे पूल बांधकाम करण्यासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतलेला असल्याची चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे

0 Comments