Header Ads Widget

यंदाचा पाऊस लांबल्यामुळे मानार प्रकल्पाचे पाणी कॅनॉल द्वारे सोडावे - प्रा रवींद्र वसंत चव्हाण

विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे - 

पाऊस लांबल्यामुळे प्रचंड प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली असून मानवी जीवन विस्कळीत झाले आहे तर मुक्या जनावरांना पिण्याच्या पाण्या साठी भटकंती करावी लागत आहे

तरी  मानार प्रकल्पाचे पाणी कॅनॉल द्वारे सोडुन सर्व सामन्याला होत असलेल्या त्रासातून मुक्त करावे अशी मागणी प्रा.रवींद्र वसंत चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदना द्वारे केली आहे.

पुरोगामी विचाराचे नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जनावराच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असल्यामुळे व शेतकऱ्याला होत असलेली पाण्याची अडचण लक्षात घेऊन सदरच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी बारूळच्या तळ्यात पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात असल्या कारणामुळे पाणी सोडण्यात यावे अशी मागणी नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र प्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांनी केली आहे 
            
नायगांव विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मान्सूम लांबल्यामुळे नदी, नाले, विहीरी, बोर कोरडे पडल्याने मोठया प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झालेली आहे.

ग्रामीण भागातील नागरीकासह, पशु, पक्षी, प्राणी, जनावरांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने गैरसोय होत असून मानार प्रकल्पाचे पाणी कॅनॉलद्वारे सोडल्यास ग्रामीण भागातील नागरीकांना व जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय होण्यास मदत होईल. 
     
तरी मे.जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जनतेच्या होणाऱ्या त्रासाचा व मुक्या जनावरांना होत असलेल्या पाण्या साठी भटकंती चा विचार करून  लवकरात लवकर मानार प्रकल्पाचे पाणी कॅनॉल द्वारे सोडून सहकार्य करावे अशी मागणी रवींद्र चव्हाण यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments