Header Ads Widget

दरोडा प्रकरणातील पाच आरोपीची सात दिवसाच्या पोलीस कोठडी नंतर आता न्यायालयीन कोठडीत रवानगी - सपोनि विशाल बहातरे यांची माहिती !!

        माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तहसील कार्यालयाच्या जवळ दिनांक ३०मे २०२३ रोजी संध्याकाळी आठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान कारला आडवून टाकलेल्या दरोड्यात आरोपीनी एकूण रक्कम ११ लाख ६२ हजार ३७३ रुपयाचा दरोडा टाकण्यात आला होता

तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत टाकण्यात आलेल्या दरोड्यातील पाच आरोपीची टप्या टप्याने पोलीस कोठडी वाढविण्यात आली होती असे सपोनि विशाल नागोराव बहातरे यांनी सांगितले आहे

पाच आरोपीना घेण्यात आलेल्या सात ते आठ दिवसाच्या पोलीस कोठडीतील पाच आरोपीची पोलीस कोठडी संपल्याच्या नंतर त्या आरोपीला दिनांक ३० जुन २०२३ रोजी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असल्याची माहिती कुंटूर पोलीस ठाण्याचें कर्तव्य सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल एन बहातरे यांनी दिली आहे

पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशानुसार नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर दिनांक ३० मे २०२३ रोजी कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या तहसील कार्यलया समोर टाकण्यात आलेल्या दरोड्यातील आरोपीला अटक करण्यासाठी एलसीबीच्या पथकासह कुंटूर पोलीसाच पथक तयार करण्यात आले होते 

Post a Comment

0 Comments