Header Ads Widget

सोयाबीन खरेदीवरील जाचक अटी रद्द संभाजी भिलवंडे यांच्या मागणीला यश

विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे :-

सोयाबीन खरेदीवरील जाचक अटी रद्द करण्याच्या काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष संभाजी भिलवंडे यांच्या  मागणी ला अखेर  यश मिळाले असून शासनाने दखल घेऊन पत्रक काढीत जाचक अटी रद्द केल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

दि. २३ जुन २०२३ रोजी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सबसिडीवर देण्यात येणारे सोयाबीन बियाणे महामंडळाचे ७२६ याच्या खरेदीवर जाचक अटी लादण्यात आल्या होत्या

त्या रद्द् करून फक्त सातबारावर शेतकऱ्यांना सबसिडीवरचे सोयाबीन बियाणाची खरेदी करण्याची परवानगी द्यावी असी महत्त्वपूर्ण मागणी नांदेड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे यांनी विभागीय कृषी संचालक श्रीयूत जगताप यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती वर्तमान पत्रातून याची दखल घेण्यात आली होती.,
  
त्यानुसार कृषी आयुक्त कृषी विभागा पुणे यांना अवाहल पाठवून शेतकऱ्यांना विना अट संबंधित वानाचे सोयाबीन बियाने उपलब्ध करून देण्याची शिफारस करण्यात आली होती

त्यानुसार कृषी संचालक महाराष्ट्र राज्य श्रीयूत विकास पाटील यांनी सदर मागणीची दखल घेवून संबंधित कृषी विभागाच्या वतीने लादण्यात आलेल्या सर्व आटी रद्दबातल करून संबधित बियाने सातबारावर थेट कृषीसेवा केंद्रावर खरेदीसाठी ऊपलब्ध करून देण्याचे आदेशीत केले आहे.
   
त्याचे आदेश एका पत्रकाद्वारे पारित झाले आहेत.तरी संबंधित शेतकरी वर्गानी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन संभाजी भिलवंडे यांनी शेतकरी वर्गाला केले आहे. नायगाव नरसी परीसरातील शेतकऱ्यांना सोयाबीन बियाने खरेदी करण्यासाठी सोयीस्कर होण्यासाठी 
संभाजी भिलवंडे उपाध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमीटी यांनी केलेल्या प्रयत्नाला अखेर यश मिळाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments