Header Ads Widget

शासनाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांना बी एल ओ चे कामे लादु नये - पालकांची मागणी

        माधव पवार
सन २०१९ साली कोरोना महामारीच्या काळापासून ग्रामीण भागात शिक्षणाचा खेळ खंडोबा झाला असल्यामुळे शासनाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांना निवडणुकीचे कामे लादु नये कारण अगोदर शाळेवर शिक्षक कमी असल्यामुळे शिक्षणाची विल्हेवाट लागली आहे

जिल्हा परिषद शाळेचें शिक्षक सोडून इतर विभागाचे कर्मचारी निवडणूक विभागाकडे घेण्यात यावे परंतु शासकीय शाळेवरील शिक्षक निवडणूकीच्या कोणत्याही कामासाठी शिक्षकाला विनाकारण कामे सोपवून विध्यार्थाचे शैक्षणिक नुकसान करू नये असी मागणी विध्यार्थाच्या पालकांनी केली आहे

येत्या आगामी काळात लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुका लागत असल्यामुळे आता पासूनच शासनाने शिक्षकाला बी एल ओ चे काम देण्यात येऊ नये केवळ मतदाना पुरतेच कामे देण्यात यावे नाव मतदान यादीत आणणे असे अनेक कामे लावत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे

शासनाने इतर विभागाचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या कडून कामे करून घ्यावेत अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे

शिक्षक खाजगी शाळेचा असो की शासकीय शाळेचा असो जिल्हा परिषद विभाग नांदेड यांनी शिक्षकांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आदेश द्यावेत परंतु विनाकारण त्यांना निवडणुकीचे कामे लादून व्यस्त ठेवू नये कारण पूर्वीच ग्रामीण भागात शिक्षणाच्या बाबतीत मोठी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे

विद्यार्थी शाळेत तर शिक्षक निवडणुकीच्या कामात असे अनेक वेळा चित्र पाहवयास मिळाले असल्यामुळे जिल्हा परिषद विभागाने पालकांची मागणी लक्षात घेऊन शासकीय शाळेचा व खाजगी शाळेच्या शिक्षकांना निवडणुकीचे कामे देऊन शिक्षणाची वाट लावू नये अशी विध्यार्थाच्या पालकांची मागणी जोरदरीत आहे

Post a Comment

0 Comments