भारताचे भाजपा पक्षाचे केंद्रीय ग्रहमंत्री अमितशहा यांनी नांदेड दौऱ्यावर येणार असल्याची संधी साधून नायगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पवार यांनी दिनांक ९ जुन २०२३ रोजी विविध रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन व उदघाटन करण्याचा सपाटा उठविला असल्यामुळे आश्यर्य व्यक्त करण्यात येत आहे
ग्रामीण भागातील सदरच्या रस्त्याचे उदघाट्न करणे म्हणजे दिनांक १० जुन २०२३ रोजी केंद्रीय ग्रहमंत्री अमित शाह यांच्या नांदेड येथील विराट सभेच्या पूर्व संदेला आमदाराच्या
प्रतिष्ठेसाठी उदघाट्न करत असल्याचे जनतेतून बोलल्या जात आहे
तालुक्यातील घुंगराळा ते बळेगाव रुई बु रस्ता हा गेल्या अनेक वर्षा पासून ना दुरुस्त होता या रस्त्याकडे कोणत्या ही राजकीय पुढाऱ्याचे लक्ष नव्हते कसा बसा या रस्त्यासाठी तेरा कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे गेल्या वर्षा पासून सांगण्यात येत होते दिनांक ९ जुन २०२३ रोजी सदरच्या रस्त्याचे उदघाटन आमदार राजेश पवार यांच्या हस्ते करण्यात आले असले तरी सदरच्या रस्त्याचे काम कधी चालू होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे
सध्या पावसाळ्याचे दिवस लागल्यामुळे अजून एक वर्ष जनतेला या रस्त्या वरूनच जाताना येताना मोठा सामना करवा लागणार आहे
आमदार राजेश पवार यांनी घुंगराळा ते बळेगाव रुई बु रस्त्याचे १३ कोटी रुपयांची उद्घाटन केले असले तरी बळेगाव येथील स्थानिक भाजपाचे कार्यकर्याना डावलून उद्घाटन करण्याचा सपाटा उठवल्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यात असंतोष निर्माण झाला आहे
ग्रामीण भागातील वास्तव चित्र दिनांक ९ जुन दिसून आले सदरच्या रस्त्याचे उदघाटन करने म्हणजे स्वतःची पाठ स्वतः थापटून घेणे हे आमदार राजेश पवार भूमिका असल्याचे ही ग्रामीण भागातील जनतेतून बोलल्या जात आहे
ग्रामीण भागातील छत्री शेळगाव सुजलेगा औराळा कौठाळा रस्त्याचे डाबंरीकारण करण्यासाठी १५ कोटी रूपयाचे उदघाटन सकाळी १० वाजता करण्यात आहे
यात खैरगाव लोहगांव रस्ता डाबंरीकरण करणे २ कोटी सकाळी ११ वाजता मेन रोड कुचेंली रस्ता डांबरीकरण यांचे उदघाटन दुपारी १२ वाजता ४ कोटी ७५ लाख रुपये अशा एकूण ३४ कोटी ७५ लाख रुपयाचा उदघाट्न सोहळा विविध ठिकाणी संपन्न होत झाला असला तरी बळेगाव येथे भाजपाचे शक्तीकेंद्र प्रमुख रावसाहेब पाटील बुथ प्रमुख लक्ष्मण पाटील यांना बोलावण्यात आले नसल्याचे रावसाहेब बेलककर यांनी सांगितले आहे

0 Comments