Header Ads Widget

नांदेड शहरात दहशत व दादागीरी खपवून घेतली जाणार नाही खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर -

       माधव पवार
सद्या सोशल मिडीयामुळे कुठलीही घटना लगेच समजत आहे.नांदेड शहरातील आसना पूलावर काँफी सेटर समोर शहादत्त महाराज सरेगांवकर यांच्यावर काही तरुणानी हल्ला केला आहे

या घटनेचा निषेध व करण्यासाठी आज एक महाराजांचे शिष्टमंडळ खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या "साईसुभाष" संपर्क कार्यालय वसंतनगर नांदेड येथे आले आसता त्यां सर्वाना दिलास देत खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यानी या घटनेचा निषेध केला व आश्या व्यक्तीची गय केली जाणार नाही आशी यावेळी प्रतिक्रिया दिली.
  
दिनांक २२ जुन २०२३ रोजी शहदत्त महाराज सरेगावकर काही  कामानिमित्त नांदेड शहरात येत आसताना आसना पूलाच्या शेजारी काही गुंड प्रवृत्तीचे दोन तिन तरुण यानी महाराजांसोबत हुज्जत घालून विनाकारण मारहाण केली या घटनेची सोशल मिडियावर पडसाद उमटले आहे

या घटनेची दखल खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यानी पूर्वीच घेऊन पोलिस प्रशासनाला खडे बोल सुनावले.व या घटनेचा निषेध करण्यासाठी आज आंनदबन गुरू गंभीरबन महाराज मठसंस्थान तुप्पा यांच्या वतीने एक शिष्ट मंडळ घेऊन नांदेड येथील जिल्हाधिकारी याना निवेदन दिले

 व त्या निवेदनाची प्रत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर याना प्रत्यक्ष भेटुन दिली यावेळी जवळजवळ ९० ते १०० महाराज सोबत होते.

Post a Comment

0 Comments