रोड राबरी करून नायगाव तालुक्यात थरार निर्माण करणाऱ्या आरोपीच्या २५ दिवसाच्या आत मुसक्या आवळण्यात नांदेड पोलिसांनी यश मिळाले पकडलेले आरोपी कुंटुर पोलिसांच्या हवाली केल्या नंतर नायगाव येथील न्यायालयात २४ जून रोजी हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.अशी माहिती कुंटुर ठाण्याचे सपोनि विशाल बहात्तरे यांनी दिली.
नायगाव तालुक्यातील कुंटुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नायगाव तहसील कार्यालयाच्या जवळ नांदेड ते नसीं जाणाऱ्या रस्त्यावर दि. ३० मे २०२३ रोजी रात्री ८ ते ९ च्या सुमारास दोन दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी युबराज नेवळे (रा. गाडीपुरा) यांची कार अडवून खंजराचा धाक दाखवून त्यांच्या जवळील ११ लाख ६४ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले होते. या प्रकरणी कुंटुर पोलीस ठाण्यात ९३/२३ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला .परंतु कुंटुर पोलिसांना या चोरीच्या तपासात यश आले नाही.
दि.२३ जून २०२३ रोजी स्थागुशाच्या पथकाला या जबरी चोरीतील एक आरोपी नायगाव येथील मच्छीमार्केटमध्ये असल्याची गुप्त माहिती मिळाली. स्थागुशाच्या पथकाने मच्छीमार्केट गाठले, नायगांव येथे जावुन सापळा रचुन लक्ष्मण जाधव २४, व्यवसाय बेकार रा. मच्छीमार्केट, यास ताब्यात घेतले.
ताब्यात घेवुन गुन्ह्याबाबत विचारपुस केली. लक्ष्मण जाधव यांनी दिलेल्या टिपेवरुन बालाजी जाधव रा. नायगाव, गजानन पिटलेवाड रा. शिवनगर नांदेड, प्रवेशकुमार ऊर्फ बबलू गायकवाड वय २६, व्यवसाय बेकार रा. बौध्दनगर, देगांव, ता. नायगाव) राधेश्याम भालेराव वय २४, रा. सखोजीनगर, नांदेड एक विधीत बालकाने मिळून जबरी चोरी केल्याचे सांगीतले.
या आरोपी पैकी प्रवेशकुमार ऊर्फ बबलू गायकवाड, राधेश्याम
भालेराव, लक्ष्मण जाधव यांना ताब्यात घेत एका विधीसंघर्षीत बालकाच्या पालकास नोटीस देवून पो. स्टे. कुंटूर येथे हजर करण्याबाब कळविले आसता त्याच्या पालकाने कुंटुर येथे बालकास हजर केले.
या चोरट्यांकडून गुन्ह्यातील ५ लाख ६० हजार रुपयांची रोकड व गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटार सायकली मुद्देमाल जप्त केला . ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीना पोलीस ठाणे कुंटूर गुरनं. ९३/२३ तपासासाठी कुंटूर पोलीसांच्या ताब्यात देण्या आले.
त्या नंतर सपोनि विशाल बहातरे यांनी नायगाव न्यायालया समोर २४ जुन रोजी हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे व राहिलेला माल व आरोपी यांचा तपास उघडकीस येण्याची शक्यता आहे.

0 Comments