नायगाव येथील यमुनाबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती साठी शिक्षणा व्यतिरिक्त वाचनाची आवड निर्माण व्हावी, शारीरिक दृष्ट्या सुदृढ व्हावे, अन्य स्पर्धा परीक्षा साठी विद्यार्थी पुढे यावेत. दफ्तर ओझे एक दिवस का होईना हलक व्हावे या उदेशाने शनिवारी दप्तर मुक्त शाळा हा उपक्रम राबवण्यात येतो
या उपक्रमा मागची भूमिका विद्यार्थी हा केंद्र बिंदू असून त्यांच्या ज्ञानात इतर क्षेत्रातील ज्ञान वाढावे व ते वृद्धिंगत व्हावे असे असल्याचे मुख्याध्यापिका सौ.सुनंदा बाळासाहेब पांडे शिराढोणकर आनंद पवार यांनी माहिती दिली.
सध्या आपल्या पाल्यांना चांगल्या दर्जेदार शाळेत प्रवेश मिळावा अशी धडपड पालकांची सुरू आहे.एकी कडे विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जातात.त्या शाळेत विद्यार्थी प्रवेश मिळावा म्हणून पालक प्रयत्न करीत असताना एक उपक्रमशील व विद्यार्थीनीच्या शिक्षणाच्या दृष्टीने पालक प्रिय शाळा म्हणून नायगाव येथील यमुनाबाई शाळेत प्रवेश मिळवण्या साठी लगेबाजी करून प्रवेश मिळविला जातो आहे.
याच शाळेच्या माध्यमातून चालणारी यमुनाबाई प्राथमिक शाळेत विविध शैक्षणिक उपक्रम सुरू असल्याचे माहीती शाळेने दिली.दफ्तर मुक्त शाळा या अंतर्गत कवायत, ध्यान धारणा, योगासने, संगीत व वाचन कट्टा दर शनिवारी घेतले जाते, अप्रगत विद्यार्थीसाठी प्रत्येक विषयाच्या अधिक तासिका,स्काॅलरशिप,व नवोदयच्याअधिक तासिका, विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळा पत्रकानुसार सकाळी संध्याकाळी अभ्यास करने आदी उपक्रम घेतले जातात
शाळेचे अध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर व प्रशासकीय सलागार के.व्ही फाजगे सर यांच्या मार्गदर्शना खाली राबविले जातात.अशी माहिती मु.अ.पांडे यांनी दिली. हा उपक्रम यशस्वी करण्या साठी आनंद पवार,नांदूरकर सर,मारोती नंदे, कोंडामंगल,गुंगेसर,शिंदे मॅडम हंबर्डे मॅडम,महाद्वाड मॅडम
" शाळेचे उपक्रम स्तुत्य व प्रभावी विकास भूरे "
यमुनाबाई शाळेचे उपक्रम स्तुत्य व प्रभावी असून या मुळे विद्यार्थ्यांना शाळेची गोडी निर्माण होत आहे लहान वयात ज्या विषयाची गोडी निर्माण करणे आवश्यक आहे तो उपक्रम शाळेत केला जातो आहे.ग्रामीण भागातील जनते साठी ही मराठी माध्यमाच्या शाळा मध्ये एक अभिनव उपक्रमशील शाळा म्हणून नावारूपास येत आहे असे पालक विकास भूरे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

0 Comments