नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दमदार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगायला लागली आहे
सदरील पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक महादेव पुरी हे गेल्या दीड ते पावणे दोन वर्षापासून ठाण्याचा कार्यभार सांभाळत असून त्यांच्या कार्यकाळात ठाण्याची चौकपणे जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची चर्चा मात्र होताना ऐकावयास मिळत आहे
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांनी कार्यभार सांभाळताच ठाण्याच्या कार्यक्षेत्रात आपले कर्तव्य चौक पणे बजावत अनेक अवैध धंदे करणाऱ्या लोकांवर त्यांनी जबरदस्त धाडी मारल्या अतिवृष्टीच्या काळात कुंटूर येथील शेतकरी पुराच्या पाण्यात अडकला होता त्यावेळी सुद्धा सपोनि पुरी यांनी धाडस दाखवून शेतकऱ्यांना पुरातून बाहेर काढले होते
कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सपोनि महादेव पुरी यांनी त्यावेळेस शेतकऱ्यांना पुराच्या बाहेर काढण्याचा स्वतः विक्रम दाखवला होता अशा ह्या दमदार पोलीस अधिकाऱ्यांची बदली झाल्याची चर्चा होत असली यापुढे सदरील ठाण्याच्या कारभारी कोण ? असा प्रश्न चर्चेला जात असला तरी सपोनि बहत्तरे की विजय जाधव यांच्या ही नावाची चर्चा सध्या तरी चालू आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्यात दमदारी काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या त्यांचा कार्यकाळ संपण्या पूर्वीच का ? होतात असा प्रश्न जन सामान्य माणसासह जाणकार मंडळीनी व्यक्त केला असून खरे सपोनि महादेव पुरी यांच्या बदलीची मात्र चर्चा टू चर्चा करण्यात येत आहे

0 Comments