Header Ads Widget

समाज घडविण्यासाठी संतांची संगत असावी लागते अरविंद महाराज सोनखेडकर यांचे मत

        माधव पवार
या पृथ्वीतलावर माणूस माणसाला घडविण्यासाठी व समाज घडवण्यासाठी संताच्या संगतीची गरज असून मानवधर्माने सुद्धा त्यांचा विचार करू समाज घडविण्याचा प्रयत्न करावा असे मत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार तथा व्याख्याते अरविंद महाराज मोरे सोनखेडकर यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे

सर्व समाजाला घेऊन चालणारा हा संप्रदाय वर्ग असल्यामुळे पंढरपूरच्या वारीत भक्तानी मोठ्या प्रमाणात सामील होण्याची गरज असून संताच्या भूमीत संतांच्या संगती शिवाय पर्याय नसल्यामुळे मानव धर्मातील लोकांनी एकत्रितपणे संताच्या संगतीत येण्याची गरज भासत असल्याचे ही महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार अरविंद महाराज सोनखेडकर यांनी आपले मौल्यवान मस्त व्यक्त केले आहे

सर्व धर्माला एकोपा करण्याचे काम व कार्य केवळ संत करू शकतात परंतु भक्ताने संताच्या विचारानुसार वागले पाहिजे संत हा संत असतो त्यांच्या विचाराची मोठ्या प्रमाणात समाजाला गरज असल्यामुळे संताच्या संगतीत राहून समाज घडविण्याचे काम संताच्या विचाराने केले पाहिजे असे ही मत अरविंद महाराज मोरे सोनखेडकर यांनी व्यक्त केले आहे

पूर्वी संतांनी जे मार्ग दाखवून दिला त्या मार्गाने चालल्यास सर्व समाजाचे हित जोपासले जाईल कुठल्या ही प्रकारचे  पंढरपूरच्या वारीमध्ये राजकारण कोणीही करण्याचा प्रयत्न करू नये कारण हा दिंडी म्हणजे संताचा फड संतांचा असल्यामुळे समाज घडविण्यासाठी संतांची संगत असावी लागते असे अरविंद महाराज सोनखेडकर यांनी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे 


Post a Comment

0 Comments