Header Ads Widget

बकरी ईद उत्सवाच्या दरम्यान कोणी वादग्रस्त पोस्ट करुन जातीय तेढ निर्माण केल्यास त्यांची गय केली जाणार नाही : सपोनि विशाल बहातरे यांचा इशारा

                माधव पवार
काही दिवसात सर्व देशभर मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्यामुळे या उत्सवाच्या दरम्यान कोणी वादग्रस्त पोस्ट करून समाजा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांची कसल्याच प्रकारची गय केली जाणार नाही असे नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहातरे यांनी कडक शब्दात इशारा दिला आहे

धार्मिक उत्सवाच्या काळात पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्वत्र शांतता अबाधित टिकून राहण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात असून व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम स्टेटस आधी ठिकाणी वादग्रस्त पोस्ट केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल यांची खबरदारी घेण्याची गरज असून तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विशाल बहातरे यांनीसांगितले आहे

सदरचा उत्सव साजरा करण्यासाठी सर्व समाजातील बांधवांनी एकत्रितपणे येऊन काही दिवसात आलेला बकरी ईद हा उत्सव सर्वांनी साजरा करावा असे आवाहन ही सपोनि विशाल बहातरे यांनी यावेळी केले आहे

नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या गावात कुंटूर पोलीस पोलीस ठाण्याचा अधिकारी म्हणून माझे सर्व सोशल मीडियावर लक्ष असून सोशल मीडियाच्या माध्यमातून वादग्रस्त  पोस्ट कोणत्या ही कार्यकर्त्यांनी व बांधवांनी करुन दोन समाजात तेढ निर्माण होईल असे पोस्ट करू नये जर केल्यास त्यांची कसल्याच प्रकारची गय केली जाणार नाही असे कुंटूर पोलिसांनी सांगितले आहे

पोस्ट करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा  कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल एन बहातरे यांनी आपल्या खाकी भाषेत इशारा दिला आहे

Post a Comment

0 Comments