नांदेड जिल्ह्यातील देगलूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रसेन देशमुख यांच्या आदेशानुसार देगलूरचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सोहम माच्छरे यांच्या मार्गदर्शनाखाली बकरी ईदच्या निमित्ताने पोलीसाचे पथ संचलन करण्यात आले व शांततेचा सर्वांना देगलूर पोलिसांच्या वतीने संदेश देण्यात आला आहे
धर्माबाद पोलीस ठाण्याचे तत्कालीन कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सोहम माच्छरे यांनी ठाण्यात कार्यरत असताना धार्मिक सण असो की महापुरुषाच्या जयंत्या असो या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या कार्यक्षेत्रात शांतता अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करीत होते
त्याच पद्धतीने देगलूर पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारल्याच्या नंतर ठाण्याच्या हदीत शांतता टिकवून ठेवण्यासाठी पोलीस निरीक्षक सोहम माच्छरे यांनी वरिष्ठाच्या आदेशाचे पालन करुन दिनांक २२ जुन २०२३ रोजी रूट मार्च काढून बकरी ईदच्या निमित्ताने एक संदेश दिला आहे
पोलीस स्टेशन देगलूर हद्दीत आगामी"बकरी ईद व इतर सण उत्सव अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी देगलूर चंद्रसेन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी १ वाजून २३ मिनिटानी व २ वाजून ४५ वाजण्याच्या दरम्यान रूट मार्च काढण्यात आला आहे
या रूट मार्च मध्ये रॅपिड ऍक्शन एकत्र फोर्स ९९ बटालियन रंगा रेड्डी अल्फा कंपनीचे प्रमुख .टी.पी बघेल (डेप्युटी कमांडंट, ३ इन्स्पेक्टर ६ सबइन्स्पेक्टर व इतर ५९ अमलदार यांच्या व पोलीस ठाणे देगलूर येथील आम्ही स्वत ३ पोलीस अधिकारी व २० पोलिस अंमलदार यांच्यासह प्रॉपर देगलूर येथील सर्व मिश्र वस्त्या मुस्लिम वस्ती व मुख्य बाजार पेठेतून रूट मार्च काढण्यात आला आहे

0 Comments