महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ५० खोके एकदम ओके असं आरोप करण्यात येत असल्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना या गटाची डोकेदुखी झाली आहे
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रत्येक कार्यक्रमां मध्ये ५० खोके एकदम ओके हा शब्द म्हणल्या शिवाय कार्यक्रमाची सुरुवात होत नाही अशी चर्चा ग्रामीण भागातून ऐकावयास मिळत आहे
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ५० आमदारांनी ५० खोके घेऊन एकदम ओकेचा गेम करुन शिवसेना फोडली असल्यामुळे राज्यातले तत्कालीन महाविकास आघाडीचे उद्धव सरकार कोसळले असल्यामुळे राजाच्या इतिहासात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व बाळासाहेबाची शिवसेना अशा दोन शिवसेना अस्तित्वात आले आहे
सत्ता संघर्षाच्या रणसंग्रामात शिवसेना प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिंदे गटाला गद्दार व पन्नास खोके एकदम ओके असा आरोप करीत उल्लेख केला आहे
सन २०२४ होऊ घातलेल्या आगामी काळातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात ५० खोके एकदम ओके या शब्दाला मोठा उत्त येणार असल्याचे आता पासून संकेत मिळत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची मात्र डोकेदुःखी ठरणार आहे

0 Comments