नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा बस्टँड जवळ पाटोदा कडे जाणाऱ्या रस्त्यावर एका मोठा खडा पडून पाणी साचत असताना सुद्धा या कडे कोणाचे ही लक्ष नसल्यामुळे ही जबाबदारी ग्रामपंचायत कार्यालयाची अन्य कोणत्या विभागाची असा सवाल करण्यात येत असला तरी गावचे सरपंच विद्यमान सरपंच माधवराव कोलगाणे यांनी गावच्या विकासाकडे लक्ष दिले खरे परंतु रस्त्यात असलेल्या खड्यात पाणी कोंडून बसले या कडे लक्ष देत नाहीत असा प्रश्न चर्चेला जात असला तरी सरपंच कोलगाणे खडा बुजवतील असी अपेक्षा नागरिकांनी केली आहे
तालुक्यातील बरबडा ग्रामपंचायत कार्यालय ही विकासाच्या दिशेने नेण्यासाठी विद्यमान दिलीपराव धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सरपंच माधवराव कोलगाणे व उपसरपंच सौ छायाताई दिलीपराव धर्माधिकारी यांनी एकीकडे प्रयत्न करीत असताना दिसून येत असले तरी दुसऱ्या बाजने बस्टँड जवळी एका वाचनालया समोर रस्त्यावरच पाणी मोठया खड्यात साचल्यामुळे नागरिकाचे आरोग्य धोक्यात येणार यांची काळजी घेऊन तात्काळ ग्रामपंचायतचे मुरूम टाकून घ्यावेत असी मागणी होत आहे
बरबडा येथे सरपंच माधवराव कोलगाणे व उपसरपंच सौ छायाताई दिलीपराव धर्माधिकारी यांच्या माध्यमातून एक ते पाच वार्डात विविध विकास कामे चालू आहेत परंतु सदरच्या रस्त्या वरील खड्डा कधी बुजवणार असा सवाल नागरिकातुन केला जातं असून या बाबीकडे गावचे विद्यमान सरपंच माधवराव कोलगाणे यांनी तात्काळ लक्ष देऊन खडा मुक्त पाणी करावे सदरच्या खड्यातील घाणपाणी वाहनामुळे नागरिकाच्या अंगावर उडत असल्यामुळे ग्रामपंचायतचे सरपंच कोलगाणे यांनी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना दिल्या आहेत
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे बरबड्याच्या बस स्टॅन्ड जवळ खड्डा पडला असताना सुद्धा या विभागाचे अधिकारी उंटावर बसून शेळ्या हाकत असल्याने ह्या रस्त्याकडे कोणाचे ही लक्ष नाही या विभागाचे अधिकारी व कर्मचारी आपापल्या तोऱ्यातच फिरत आहे
अशाच पद्धतीची अनेक ठिकाणी रस्त्याची वाट लागली असताना सुद्धा अधिकारी डोळे झाक करीत असून सदरचे काम ग्रामपंचायत कार्यालयाचे नसताना सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचे भुरदंड पंचायत कार्यालयावर पडत आहे

0 Comments