Header Ads Widget

बरबडा ते कृष्णूर रस्त्यावरच्या पूल बांधकामाची गुत्तेदारानी पावसाळ्याची अडचण लक्षात घेऊन परत गती वाढविली

        माधव पवार
नायगाव तालुक्यातील कृष्णूर ते बरबडा रस्त्यावरील १४ पिलरच्या पुलाचे गुत्तेदाराच्या मार्फत बांधकाम करण्यात येत असलेल्या पूल बांधकामाची अधिकची गती गुत्तेदार नामदेव पाटील व संबंधित अधिकाऱ्यांनी वाढविली असल्यामुळे सदरचा पूल लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे गुत्तेदारानी सुद्धा पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन सदरच्या कामाची गती वाढवली असल्याचे सदरचे वास्तव चित्र दिसत आहे

तालुक्यातील बरबडा ते कृष्णूर रस्त्याच्या पुलाचे बांधकाम शासनाच्या परिपत्रकानुसार करण्यात येत असल्याने संबंधित विभागाचे अधिकारी समाधान व्यक्त करीत असले तरी या कामाचे गुत्तेदार नामदेव पाटील टेंभुर्णीकर यांच्या कडून पुल बांधकामाची यंत्रणा अधिकची गतिमान केली असल्याचे त्यांच्या कामा वरून दिसून येत आहे

कृष्णूर ते बरबडा रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली नव्हती लोक प्रतिनिधीच्या पाठपुराव्या नंतर सदरच्या कामाला मंजूर मिळाली असल्यामुळे या रस्त्यावरील कामाला सुरुवात करण्यात आली सदरचा मार्ग हा बरबडा ते कृष्णूर नागरिकांना व वाहन धारकांसाठी जवळ आणि सोपा मार्ग असल्यामुळे सदरचे काम लवकर करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुत्तेदाराना सूचना दिल्या नुसार सदरच्या कामाची गती अधिकची वाढविण्यात आली आहे 

  




Post a Comment

0 Comments