Header Ads Widget

आमदार राजेश पवार यांच्या माध्यमातून सहा महिन्यात आंतरगावच्या विकास कामासाठी सरपंच गजानन पाटील तोडे यांनी दोन कोटी पाच लाख रुपयाचे कामे मंजूर !!

        माधव पवार
नायगाव तालुक्यातील अंतरगाव ग्रामपंचायतचे युवा तरुण बांड सरपंच गजानन आनंदराव पाटील तोडे अवघ्या सहा महिन्याच्या काळात गावच्या विकासासाठी धडपड करून नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांच्या माध्यमातून गावच्या विकासाला योगदान म्हणून मंजूर करून घेतले असल्याचे त्याने सांगितले आहे

सदरच्या गावची ग्रामपंचायत कार्यालय ही विकासाच्या दिशेने जात असून गावचा जास्तीचा विकास करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची ही सरपंच गजानन पाटील यांनी सांगितले आहे

तालुक्यातील आंतरगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या गावाला पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा म्हणून जल जीवन मिशन योजने अंतर्गत एक कोटी १८ लाख रुपयाचे मंजूर करुन सदरचे काम चालू असून त्याच बरोबर आरोग्य उपकेंद्रासाठी अंदाजे ५५ लाख रुपयाचे काम मंजूर करुन घेण्यात आले तर दहा लाख रुपयाचे अंगणवाडीचे काम मंजूर आणि दहा लाख रुपयाचा सी सी रस्ता करण्यात आला ते पूर्ण करण्यात आला आहे 

नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून विविध विकास कामासाठी दहा लाख रुपये मंजूर करण्यात आले यात दलित वस्तीसाठी तर दुसरा निधी सर्वसाधारण दलित वस्तीत वापरण्यासाठी मंजूर करण्यात आला तर आमदार राजेश पवार यांच्या माध्यमातून व डीपीसी अंतर्गत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे समाज मंदिरच्या दुरुस्तीसाठी दोन लाख ९० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत

दोन लाख ५५ हजार रुपये नाली बांधकामासाठी वापरण्यात आला व काम पूर्ण झाल्याचे सरपंच गजानन पाटील तोडे यांनी सांगितले आहे



Post a Comment

0 Comments