Header Ads Widget

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात शिवसैनिक म्हणून काम करणार जाहीर प्रवेशा नंतरयोगेश पाटील नंदनवनकर दिली प्रतिक्रिया !!

        माधव पवार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत शिवसेना फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड शेकापचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील नंदनवनकर यानी शिवसेनेत जाहिर प्रवेश करुन शिवबंधन बांधून घेतले यावेळी योगेश पाटील नंदनवनकर यानी नांदेड लोहा कंधार ग्रामीण भागात उद्वव बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून काम करणार आसल्याचे मत व्यक्त केले आहे 

शेकापचे योगेश पाटील नंदनवनकर हे गेल्या १५ वर्षापासून राजकीय क्षेत्रात विविध पदावर काम केलेले असून ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्था सहकारी क्षेत्रात शेतकरी कामगार पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष म्हणून ही त्यांनी काम पाहिले तर सन २०१९  लोहा-कंधार विधानसभा मतदार संघात शेकापचे आमदार निवडून आणण्यासाठी सुद्धा प्रंचंड मेहनत घेतली होती 

आमदार श्यामसुंदर शिंदे यांचा प्रवक्ता प्रसिद्धी प्रमुख म्हणून ही योगेश पाटील नंदनवनकर त्यांनी काम केले यांचा ग्रामीण भागात ही प्रंचंड दांडगा जनसंपर्क असल्यामुळे रस्त्यावर उतरून सर्व सामान्यांसाठी काम करणारा लढाऊ व बेधडक निर्भीड नेतृत्वाचा कार्यकर्ता म्हणून योगेश पाटील नंदनवनकर अशी त्याची ओळख आहे
भविष्यात लोहा कंधार मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आमदार निवडून आणण्यासाठी काम करणार असल्याचे नंदनवनकर यांनी नायगाव फास्ट न्यूजशी सांगितले आहे 

या प्रवेशाच्यावेळी शिवसेना नेते तथा सचिव खासदार अनिलजी देसाई साहेब.नांदेड जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बबनरावजी थोरात,शिवसेना सचिव सुरजजी चव्हाण,युवासेना नांदेड विस्तारक विशाल सावंत,नांदेड शिवसेना जिल्हाप्रमुख माधव पावडे,उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील कराळे,युवासेना जिल्हाप्रमुख बालाजी पाटील शिंदे, युवासेना जिल्हा समन्वयक

बळवंत तेलंग, शिवसेना महानगरप्रमुख नवज्योतसिंग गाडीवाले,युतीसेना राज्य विस्तारक प्रियंका जोशी,युतीसेना विस्तारक गीता कदम,नांदेड जिल्हा युतीसेना अधिकारी रोहिणी कुलकर्णी यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला.यावेळी उपस्थित सर्वाचे आभार योगेश पाटील नंदनवनकर यानी मानले आहे 


Post a Comment

0 Comments