Header Ads Widget

संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यासह गुत्तेदाराच्या संगणमताने जलजीवन मिशन अंतर्गत विहिरीचे बांधकाम चालते बेवारस !!

         माधव पवार
नायगाव ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत करण्यात येत असलेल्या तालुक्यातील रुई बु येथे जलजीवन मिशन योजनेचे काम अधिकाऱ्यासह गुत्तेदाराच्या सांगणमताने संत गतीने बांधकाम चालत असले तरी सदरच्या विहिरीवर ना पाणी पाणी पुरवठा अधिकारी ना गुत्तेदार सदरचे बांधकाम मिस्त्रीच्या मिर्जी नुसार होत असल्यामुळे दर्जा हिन होत असल्याचे वास्तव चित्र रुई बु येथे दिसून येत आहे

नायगाव तालुक्यातील मौजे रुई बु येथील जल जीवन मिशन अंतर्गत करण्यात येत असलेले कामाला शासनाने १ कोठी ३४ लाख रुपया पेक्षा जास्त रक्कम दिली असताना सुद्धा गुत्तेदार व संबंधित अधिकाऱ्यानी जाणून बुजून दुर्लक्ष विहिरीकडे  दुर्लक्ष केल्यामुळे सदरचे बांधकाम बे वारस चालत असल्याचे दिसून येत आहे

रुई बु येथील सदरच्या जल जीवन मिशन योजनेच्या अंतर्गत करण्यात येत असलेले पाणी पुरवठ्याच्या विहिरीचे बांधकाम गिट्टी पेक्षा जास्त रेती जास्त मिसळून काम करीत असल्याचे दिसून येत असून सदरच्या कामा कडे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी बेदखल दुर्लक्ष केल्यामुळे सदरचे बांधकाम मिस्त्रीच्या मना प्रमाणे चालत असल्याचे दिसून येत आहे

सदरचे काम दर्जेदार करण्यात यावे म्हणून गावचे सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख व ग्रामसेवक नागोराव सूर्यवंशी व सदस्य प्रयत्न करीत असले तरी सदरचे बेवारस चालत आहे



Post a Comment

0 Comments