महाराष्ट्र राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या वर्षा पासून मोठा राजकीय खेळ खंडोबा चालत असल्यामुळे या राज्यातल्या राज्यकर्त्यांनो राजकीय खेळ खंडोबा बंद करून जरा शेतकऱ्याकडे तरी बघा असा सवाल शेतकऱ्यांनी केला असून आज पर्यंतच्या कार्यकाळात सरकार शेतकऱ्याला काही तरी मदत करील अशी अपेक्षने केली व पाहत राहिली आहे
राज्यातले राजकीय नेते मंडळी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून राज्यात खेळ खंडोबा चालूच ठेवला असल्याचे ही जनसामान्य माणसासह शेतकऱ्यातून बोलल्या जात आहे
राज्यात गेल्या दोन वर्षा खाली महाविकास आघाडीचे सरकार होते सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अस्तित्वात असल्याने या राज्यात राजकीय खेळ खंडोबा वाढला शेतकऱ्यांच्या समस्या कडे अथवा त्यांच्या प्रश्नाकडे कोणता ही राजकीय नेता लक्ष देत नसल्यामुळे बहूसंख्य शेतकऱ्यांना अनेक बाबींचा सामना करावा लागत आहे
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह शिवसेना प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याच बरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यातला राजकीय खेळ खंडोबा बंद करुन शेतकऱ्याकडे लक्ष देतील का ? असा ही सवाल शेतकऱ्यानी केला आहे
राज्यात सरकार कोणत्या ही पक्षाचे असो महा विकास आघाडीचे असो की ईडीचे सरकार असो शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे सरकार असले पाहिजे असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे

0 Comments