Header Ads Widget

बारूळच्या मानार धरणाचे पाणी सोडण्यासाठीखासदार प्रताप पाटील चिखलीकरानी लक्ष घालावी शिवराज पाटील होटाळकर यांची मागणी

विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे -
पाऊस लांबल्यामुळे बारूळच्या मानार प्रकल्पाचे पाणी कॅनॉल द्वारे  सोडन्यासाठी जिल्हाधिकारी नांदेड यांना सूचना देऊन तात्काळ जनतेची व पशु प्राण्यांची व्यवस्था दूर करण्याची मागणी खा.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या कडे शिवराज पाटील होटाळकर यांनी निवेदना द्वारे केली 
      
नायगांव विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मान्सून लांबल्यामुळे नदी, नाले, विहीरी, बोर कोरडे पडल्याने मोठया प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झालेली आहे.

ग्रामीण भागातील नागरीकासह, पशु, पक्षी, प्राणी, जनावरांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने गैरसोय होत असून मानार प्रकल्पाचे पाणी कॅनॉलद्वारे सोडल्यास ग्रामीण भागातील नागरीकांना व जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय होण्यास मदत होईल. 
     
नांदेड जिल्हाचे खासदार प्रताप पाटील चिखंलीकर लवकरात लवकर मानार प्रकल्पाचे पाणी कॅनॉल द्वारे सोडन्या साठी जिल्हाधिकारी यांना सूचना देऊन जनतेची अडचण दूर करण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी शिवराज पाटील होटाळकर भाजप जिल्हा सरचिटणीस नांदेड यांनी निवेदना द्वारे केली आहे.

Post a Comment

0 Comments