नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्यात नूतन स.पो.नि.विशाल एन बहातरे यांनी ठाण्याचा पदभार नुकताच स्विकारला असल्यामुळे यांचा रुई बु चे माजी सरपंच गजानन भुजंगराव पाटील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १८ जुन २०२३ रोजी ४ वाजता कुंटूर पोलीस ठाण्यात विशेष सत्कार करण्यात आला आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांची बदली नांदेड येथे झाल्याच्या नंतर या ठाण्याचा कार्यभार कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बाहातरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे
सदरच्या पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी व सन्मान करण्यासाठी ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने सपोनि बहातरे यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात येत आहेकुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या रुई बु नगरीचे माजी सरपंच गजानन भुजंगराव पाटील शिंदे मारोती पाटील शिंदे दिगंबर पाटील शिंदे देविदास मागीलवाड उत्तम पिंपळे प्रभाकर पाटील जाधव माधव गंगातिरे साईनाथ पाटील शिंदे साहेबराव पाटील इंगळे दिलीप पाटील शिंदे रामदास पाटील जिगळे प्रल्हाद पाटील शिंदे आदीने सत्कार करुन अभिनंदन केले आहे
रुई बु बिटचे जेमादार संतोष कुमरे यांची बदली धर्माबाद पोलीस ठाण्यात झाली असल्यामुळे त्यांच्या जागेवर बिट जेमादार म्हणून आर टी पवार यांनी आल्यामुळे यांचा ही यावेळी भव्य सत्कार गजानन पाटील शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला आहे
माजी सरपंच गजानन पाटील यांच्या नेतृत्वाखाली नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल नागोराव बहातरे, फौजदार संजय अटकोरे एस एम कुमरे यांचा विशेश सत्कार करुन अभिनंदन करुन भावी कार्यासाठी शुभेच्छा केले आहे

0 Comments