Header Ads Widget

भोकरच्या सीता खांडीत झालेल्या अपघातात चार जण ठार तर चार जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना

        माधव पवार
नांदेड जिल्हाच्या भोकर रोड वरील सिंताखाडी घाटात ऑटो व मॅजिक यांची जबरदस्त धडक झाली असल्यामुळे यात ४ प्रवाशी जागीच ठार झाले असल्याचे सांगण्यात येते तर तर ४ जण जखमी झाले असल्याची दुर्दैवी घटना दिनांक १९ जुन २०२३ रोजी घडली असून सदरच्या अपघातामुळे भिंतीचे निर्माण झाले असल्याची प्रतिक्रिया अनेकानी व्यक्त  करीत असल्याचे ऐकावयास मिळत आहे
भोकर ते नांदेड रोड वर असलेल्या सीता खांडीत अनेक वेळा अपघात होताना सांगण्यात येते सदरचा अपघात मॅजीक गाडी नंबर एम.एच २६-बिएक्स ३८१५ गाडी असून सदरची घटना घडताच भोकर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटना स्थळी रवाना झाल्याचे सांगण्यात येत तर जखमीना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती आहे

भोकर पासून जवळच असलेल्या सीताखांडी येथे नांदेड कडून भोकरकडे विटा घेऊन जाणारा टेम्पो क्रमांक एम एच २६ ३८१५ तर भोकर कडून नांदेड मॅजिक ऑटोची समोरासमोर भीषण अपघात झाला असून या सदरच्या भुलाबाई गणेश जाधव ४६ वर्ष राहणार पोटा तांडा तालुका हिमायतनगर संदीप किशन किसवे २५ वर्ष राहणार हळदा तालुका भोकर संजय इरबा कदम वय ४८वर्ष राहणार हिमायतनगर तसेच बाबुराव रामसिंग राठोड ५६ वर्ष राहणार पाकी तांडा तालुका भोकर हे जागीच ठार झाले असल्याची माहिती आहे 

भोकर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत झालेला अपघात हा अतिशय दुर्दैवी असल्याचे मानले जात असून सदरच्या अपघातात चार जण जागीच ठार झाले तर चार जण जखमी झाले असल्याची घटना चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान घडली असल्याचे सांगण्यात येते यात परंतु सदरच्या जखमी ना शासकीय रुग्णालयात नेले की खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले यांची माहिती अधिक मिळाली नसून अधिक माहिती थोड्या वेळात मिळण्याची शक्यता आहे 








Post a Comment

0 Comments