नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्यात गेल्या सहा वर्षापासून कार्यरत असलेले व रुई व कृष्णूर बीटचे कर्तव्यदक्ष तथा मनमिळाव व्यक्तिमत्व असलेले खाकीतील माणूस एक पोलीस कर्मचारी जेमादार एस एम कुंमरे यांची कुंटूर पोलीस ठाण्यातून धर्माबाद पोलीस ठाण्यात बदली झाली तर बिट जेमादार म्हणून आर टी पवार हे या बिट वर आले आहेत
बिट जेमादार एस एम कुमरे अशा मनमिळाऊ व्यक्तीमत्व असलेल्या कर्तव्यदक्ष जेमादारांचा कृष्णूर ग्रामपंचायत कार्यालयांच्या वतीने केंद्रीय प्राथमिक शाळेत माजी जिल्हा परिषद सदस्यां प्रतिनिधी पंढरीनाथ कमठेवाड यांच्या नेतृत्वाखाली निरोप व भव्य सत्कार करण्यात आला आहे
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष बीटचे जेमादार संतोष कुमरे यांनी या ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या गावांत शांतता प्रस्थापित राहण्यासाठी वरिष्ठांचे आदेश पाळून चांगली कामागिरी बजावली असल्यामुळे कृष्णूर केंद्रीय प्राथमिक शाळेत ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने निरोप देऊन सत्कार करण्यात आला असून सदरील कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले होते
यावेळी आर एस पाटील जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी पंढरीनाथ कमठेवाड केंद्रप्रमुख उद्धव ढगे शाळेचे मुख्याध्यापक हौसाजी वारघडे यांची प्रमुख उपस्थिती होती
कृष्णूर ग्रामपंचायतचे सरपंच विजय जाधव गजानन पाटील जाधव शंकर पाटील नादरे दिगंबर पवार संभाजी गंगातीर्थ रमेश हनमंते दिगंबर जाधव धीरज पाटील जाधव अमोल नावंदे आनंद माली पाटील श्रीधर कागडे यांच्या विशेष उपस्थितीत कुंटूर पोलीस पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष रुई बीटचे जेमादार एस एम कुमरे यांनी गेले सहा वर्षाचा कार्यकाळ चांगल्या प्रकारे काढला आहे
त्यांच्या हद्दीत असलेल्या गावातील जन सामान्य माणसात खाकीतील पोलीस कर्मचारी म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या कुमरे यांना विविध ठिकाणी निरोप देऊन सत्कार करण्यात येत आहे

0 Comments