Header Ads Widget

शासन आपल्या दारी मोहिमेची गती वाढवा अन्यथा बंद करा - नुसते कागदी घोडे नाचवू नका - जनतेचा सवाल -

        माधव पवार
राज्यात राज्य सरकारने गोरगरीब जनतेच्याआडी अडचणी व समस्यावर मात करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासन आपल्या दारी या मोहिमेची अंमलबजावणी केली परंतु ग्रामीण भागात थेट जनतेच्या दारात जात नसल्यामुळे या मोहिमेत नुसते कागदी घोडे नाचवू नका गती वाढवा अन्यथा बंद करा असा सवाल जनतेने व्यक्त केला आहे

राज्य सरकारने घेतलेले आज पर्यंतचे निर्णय कागदावरच असल्यामुळे हे कागदी घोडे नाचविण्या पेक्षा त्यांची सुरक्षितपणे व अंमलबजावणी करणे ही काळाची गरज असून शासन आपल्या दारी ही सुद्धा मोहीम प्रभावी रागविण्यात यावी परंतु जनताच शासनाच्या दारी म्हणण्याची वेळ आली असून शासनाने केलेल्या घोषणा बऱ्याच पैकी प्रलंबित असल्यामुळे त्या सुद्धा घोषणाची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे असे ही सदरच्या जनतेतून बोलल्या जात आहे

महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत आर आर पाटील यांनी सुद्धा महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेची अमलबजावणी केली व काही वर्षे राज्यात प्रभावीपणे चालली या सदरच्या मोहिमेतून अनेक गावे बक्षीस पात्र ठरले होते त्यानंतर महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम ही मुक्त होण्याच्या मार्गावर असल्यामुळे या मोहिमेला ग्रामीण भागात फार से महत्व राहिले नाही वाटत नसल्यामुळे सदरची मोहीम सुद्धा आकाशी उडते पाखरू बनली आहे

जिल्ह्यासह ग्रामीण भागात शासन आपल्या दारी या मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यासह संबंधित तहसील विभाग जास्तीचे लक्ष घालून शासन आपल्या दारी या मोहिमेला प्राधान्य देण्याची गरज असल्यामुळे सदरची मोहीम चांगल्या प्रकारे राबवली पाहिजे असा मूळ हेतू सरकारचा असला तरी ग्रामीण भागात मात्र शासन आपल्या दारी या मोहिमेचा चांगलाच फज्जा उडताना दिसून येत आहे 

Post a Comment

0 Comments