माधव पवार
राज्यात काँग्रेस पक्षाची राजवट असताना सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत करण्यात आलेल्या ३०५४ हेडच्या माध्यमातून रस्त्याचे देखभाल दुरुस्तीचे खड्डे बुजविण्याचे कामे कोठ्यावधी रुपयाचे करण्यात आले होते परंतु भाजपा युती सरकारच्या कार्यकाळात मात्र खड्डे बुजविण्याच्या कामाचे देयके अद्याप तरी कॉन्ट्रॅक्टराला मिळाले नसल्यामुळे गुत्तेदार हैराण गल्लीत परेशान गुत्तेदार म्हण्याची त्याच्यावर आली आहे
जिल्ह्यात असो की ग्रामीण भागात सन २०११ ते १२ व २०१२ ते २०१३ साली करण्यात आलेल्या गुत्तेदारा मार्फत रस्त्याची देखभाल दुरुस्ती शासनाने मोठया प्रमाणात करून घेतले आणि त्यांना त्या कामाचे पैसेच दिले नसल्यामुळे कॉन्टॅक्टरदार चिंता ग्रस्त असल्याचे त्यांच्या सांगण्या वरून दिसून येत आहे
काँग्रेस सरकारने सदरच्या गुत्तेदारां कडून काम करून घेतले आणि राज्यात सत्ता बदली अन भाजपा युतीचे आले या सरकारने अद्याप तरी बिले दिले नसल्यामुळे कोणताच गुत्तेदार खड्डे बुजवण्याचे काम घेत नसल्यामुळे अनेक रस्त्यांची ग्रामीण भागात विल्हेवाट लागली असल्याचे चित्र वास्तव पहावयास मिळत आहे
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदरच्या संबंधित गुतेदारांचे तब्बल बारा वर्षापासून कामाचे बिल रोखले असल्यामुळे त्यांना तात्काळ देण्यात यावी असे गुत्तेदारातून मागणी केल्या जात आहे

0 Comments