नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली येथे मयत अक्षय भालेराव यांचा निर्घृण केलेल्या हत्या प्रकरणी बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथे फुले शाहू आंबेडकर क्रांती मंचच्या वतीने दिनांक ५ जुन २०२३ रोजी तीव्र निषेध व निदर्शने करण्यात आली असून यावेळी शकडो कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनि संकेत दिघे यांनी चौक बंदोबस्त ठेवला आहे
या गावांत गेल्या ५० ते ६० वर्षा पासून भारतीय राज्य घटना काराची भीम जयंती साजरी करण्यात येत नव्हती याच गावातील मयत अक्षय भालेराव यांनी या वर्षी म्हणजे २०२३ रोजी नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडून रीतसर परवानगी घेऊन सदरचा जयंती सोहळा साजरा केला होता
मयत अक्षय भालेराव यांची निर्घृण हत्या करण्यात आणि गावात तगडा पोलीस बंदोबस्त लागला मयत अक्षयच्या कुटुंबीयांना पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावे म्हणून शंकरनगर येथे कार्यकर्त्याचे वतीने निषेध करण्यात आले आहे
कुटुंबातील एका व्याक्तीस शासकीय नोकरीत समाविष्ट करण्यात यावे व त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे तसेच हत्ते प्रकरणातील आरोपीवर कडक शासन करण्यात यावे म्हणून निदर्शने करण्यात आली आहे
मयत अक्षय हत्या प्रकरणातील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे सदरच्या हत्याराला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा मागण्या निषेध व निदर्शने करते वेळी करण्यात आल्या आहेत
यावेळी फुले शाहू आंबेडकर क्रांती मंच संस्थापक अध्यक्ष भास्कर भेदेकर, सुनील कांबळे, नागसेन जिगळेकर ,प्रमोद फकिरे ,निळकंठ तरटे ,जयदीप कांबळे, दयानंद कांबळे , प्रकाश हो नसांगळे, इंद्रजीत डुमणे श्याम गायकवाड, संदीप उमरे, विकास कांबळे, प्रवीण फकीरे, ब्रम्हा कांबळे, मुनेश्वर सोनकांबळे, अंकुश वाघमारे, चांदु सोनकांबळे , बाबू भेदेकर, राहुल भेदेकर, साहेबराव बक्कावाड कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Comments