हिमायतनगर : नागोराव शिंदे :-
हिमायतनगर पळसपुर डोल तालुक्यातील हिमायतनगर पळसपुर डोलारी सीरपली रस्त्याचे काम एक वर्षापासून सुरू केले असून काम संथ गतीने चालू असल्याने रस्त्यावरील पुलाचे काम अर्धवट झाले असल्याने काम पावसाळ्यापूर्वी करण्यात यावे यासाठी पळसपुर डोल्हारी सीरपली येथील नागरिकांनी तहसील याना निवेदन देऊन आमरण उपोषणाला बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे
शासनाने गावकऱ्यांना येणे जाणे करण्यासाठी सोईचे व्हावे वी यासाठी शेतकऱ्याच्या शेतीमाल हा बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याकरता व शेती करता लागणारे बी बियाणे करता पक्के रस्ते उभारण्याचे काम प्रगतीपथावर चालू असून त्याला अपवाद म्हणून काय आमच्या हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर डोल्हारी सीरपली रस्त्याचे काम प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत चालू असून सदरील काम अतिशय कासवगतीने होते
संबंधित गुत्तेदारानी पुलाचे काम खोदुन ठेवल्याने रस्त्यावर असलेल्या पुलाचे कामही अर्धवट स्थितीत आहे व जागोजागी पुलाचे काम खोदकाम करून ठेवले आहे व रस्त्याचे कामही अर्धवट आहे रस्त्यावरील गीट्टी उखडून गेल्याने अपधात होत आहेत.मागील दोन महिन्यापासून कामही बंद अवस्थेत ठेवले आहे
आता लवकरच पावसाळा चालू होणार संबंधित गुत्तेदाराने जागोजाग रस्त्यावरील पुलाचे काम करण्यासाठी आम्हा शेतकऱ्यांना बी बियाणे खते नेणे अवघड होणार आहे सदरील खोदून ठेवलेल्या पुलाचे कामाच्या खड्ड्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन गावाचा संपर्क तुटण्याचे दाट शक्यता आहे संबंधित गुत्तेदारानी पावसाळ्यापूर्वी पुलाचे रस्त्याचे काम त्वरित करण्यात यावे यासाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले
काम न केल्यास काही विघटित घटना घडल्यास पूर परिस्थिती निर्माण झाल्यास संबंधित गुत्तेदार व संबंधित कामा करता अधिकारी जबाबदार राहतील या साठी पावसाळ्यापूर्वी काम करण्यासाठी पळसपुर डोल्हारी सीरपली गावकऱ्यांना लोकशाही मार्गाचा अवलंब करून तहसील कार्यालय हिमायतनगर येथे उपोषणाला बसावे लागेल असे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले होते
यावेळी डॉ. प्रकाश वानखेडे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती हिमायतनगर, रमेश पाटील कदम डोल्हारी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती अनिल पाटील सीरपली, साहेबराव पाटील डोल्हारी, दिलीप साळवे माजी सभापती पंचायत समिती, विठ्ठल गायकवाड, नागोराव शिंदे पळसपुर पत्रकार, चांदराव वानखेडे पळसपुर माजी चेअरमन, दिनेश राऊत डोलारी,तुकाराम जाधव शिरपली, ,आनंदराव माने डोलारी ,मारोती आनंदराव कदम, डोलारी पळसपुर सीरपली येथील ग्रामस्थांच्या निवेदनावर साक्षर्या आहेत
हिमायतनगरच्या तहसीलदाराचा गुत्तेदाराला दम दोन दिवसात काम चालू करा अन्यथा नागरिक उपोषणाच्या तयारीत " वा साहेब वा "

0 Comments