Header Ads Widget

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष तथा बुलंद तोफ राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णाला फळांचे वाटप

        माधव पवार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्राची बुलंद तोफ राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नायगावच्या ग्रामीण रुग्णालयातील रुग्णाला मनसे कार्यकर्त्यांच्या वतीने नुकतेच फळांचे वाटप करण्यात आले असी माहिती शिवाजी पाटील सातेगावकर यांनी नायगाव फास्ट न्यूजला दिली आहे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी नांदेड शहर सचिव गणेश अण्णा जोरगेवार मनसे यांच्यासह नायगाव तालुक्यातील नेतृत्व करणारे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील जाधव सातेगावकर यांच्या नेतृत्वाखाली राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नायगाव शहर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले आहे सदरच्या ग्रामीण रुग्णालयात फळाचे वाटप करते वेळी मनसेचे कार्यकर्ते मारोती बोईनवाड मंगेश शिंदे चंद्रकांत चव्हाण चंद्रकांत कोंकेवाड अमोल मोरे सुनील शिंदे राम पांचाळ गजानन भादवड वाढदिवस मोठ्या उत्साहात प्रमाणात साजरा करण्यात आला असल्याची माहिती शिवाजी पाटील सातेगावकर यांनी दिली आहे

मनसे नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष तथा बुलंद तोफ राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णाला फळांचे वाटप करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments