नांदेड जिल्ह्याच्या बोंढार येथे अक्षय भालेराव या बौद्ध युवकाची झालेली हत्या ही अत्यंत दुर्दैवी झाली असून निषेधार्ह बाब असून सदरचा खून खटला हा फास्टट्रॅक न्यायालयात चालविण्यासह प्रकरणातील दोषीविरुद्ध कडक शासन व्हावे शासनाने सदर कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घेऊन त्यांचे पुनर्वसन करावे ही आपली प्रमुख मागणी आहे
मयत अक्षय भालेराव कुटुंबीयांच्या पाठीशी महाराष्ट्रातील काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग खंबीरपणे उभा राहील असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ हत्तीआंबिरे यांनी बोंढार येथे अक्षय भालेराव कुटुंबीयांच्या सांत्वन पर भेटी दरम्यान बोलताना केले आहे
काँग्रेस मागासवर्गीय विभागाच्या वतीने प्रमुख पदाधिकाऱ्यासह बोंढार हवेली येथे अक्षय भालेराव कुटुंबियांची भेट देऊन त्यांचे सांत्वन करत अक्षय भालेराव यांच्या मातोश्री व बंधू यांच्याकडे रोख दीड लाख रुपयाची मदत त्यांनी आपल्या भेटी दरम्यान दिली आहे
यावेळी प्रदेश सरचिटणीस प्रफुल्ल सावंत,काँग्रेस मागासवर्गीय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा.मनोहर पवार,शहर जिल्हाध्यक्ष (अनु. जाती.)मंगेश कदम,प्रदेश महिला काँग्रेस सरचिटणीस श्रीमती अनिताताई इंगोले,प्रदेश सरचिटणीस सुमिती व्याळकर नगरसेवक सोनाजीराव सरोदे,सुभाष काटकांबळे,मुदखेड तालुकाध्यक्ष संजय कोलते,महेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते
जिल्हा सरचिटणीस संजीवकुमार गायकवाड,प्रवीण वाघमार दिगंबर गायकवाड जिल्हा संघटक,उमरी तालुका अध्यक्ष दिनकर भंडारे,बिलोली माधव वाघमारे,लोहा तालुका मधुकर डाकोरे नायगाव तालुका अध्यक्ष दत्तात्रेय आईलवर, हिमायतनगर तालुका अध्यक्ष संतोष आंबेकर,जिल्हा सचिव राहुल लोखंडे,जिल्हा सचिव पंडित वाघमारे आदीची उपस्थिती होती
जिल्हा उपाध्यक्ष रामराव सोनसळे कामाजी अटकोरे भी.ना.गायकवाड,किशनराव रावणगावकर,अनु.जाती आदी पदाधीकारी व लक्ष्मन कसले आनंद कर्णे,अनिल सरपेदिगंबर माने दिपक पावले बाळू राऊत,महेंद्र गायकवाड,
जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जातीय विभाग संघटक दिंगाबर माणिकराव गंगासागरे, सोशल मीडियाचे नायगाव विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण कासराळे होते
सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल सावंत यांनी केले तर आभार मुदखेड तालुका अध्यक्ष संजय कोलते यांनी मानले

0 Comments