Header Ads Widget

बालसाहित्यातील बादशहा : शंकरराव बोईनवाड

नायगाव फास्ट न्यूज थेट नेटवर्क - लातूर

नोकरी पैशाने खरेदी करता येते पण बुध्दिमत्ता नाही. असे विद्वान, बुध्दिमान, नितीमान असे बाल साहित्यिक शंकरराव बोईनवाड साहेब यांचा १५ जून २०२३ रोजी वाढदिवस असून त्यांना शब्दरूपी शुभेच्छा देणे आपले कर्तव्य तर आहेच पण एका हुशार बुध्दिवंत, किर्तीवंत मित्रांना शुभेच्छा देणे अवघडच असते त्यातल्या त्यात साहित्यिकाविषयी लिहणे अवघड आहे.
      
शंकर बोईनवाड एक उच्च शिक्षित लेखक, कवी, संपादक, एक झुंजार पत्रकार आहेत. त्यांनी अनेक वृत्तपत्राच्या माध्यमातून कथा, कविता, स्तंभलेखन, बालसाहित्य मोठ्या प्रमाणात लिहिले असून लहान मुलांच्या बुद्धी मतेला चालना मिळावी म्हणून बालसाहित्यात आपल्या बुध्दीचा कस लावून बाल साहित्याची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली आहे

त्यांचा  "चिव चिव चिमणी " व "कोल्हेवाडीचा बाजार "ही दोन बाल कवितासंग्रह प्रकाशित असून ऑगस्ट मध्ये "आदर्श नगरीचा राजू " ही किशोर कादंबरी प्रकाशित होणार आहे. त्यांचे मराठी भाषेवर एवढे प्रभुत्व आहे की, त्यांनी प्रकाशित केलेल्या बालसाहित्याला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.त्यामुळे शंकर बोईनवाड हे बालसाहित्यातील बादशहाच आहेत

असं म्हणावं लागेल. वैचारिक अधिष्ठान असलेले शंकर बोईनवाड यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्या कारणाने प्रचंड बुद्धीमत्ता असूनही उपेक्षित राहिले आहेत.एखादा प्राध्यापक होवून सुखी संसाराचा गाडा हाकावा व मिळेल त्या वेळेत समाजसेवा करावी असा त्यांचा बेत असावा पण त्यांचे स्वप्न काही सत्यात उतरलेले दिसत नाहीत

साहित्याच्या माध्यमातून प्रखरपणे लिखाण करून अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवावा हे स्वप्न पाहत असताना बऱ्याच ठिकाणी स्वाभिमान आडवा आला अनेक नोकरीच्या संधी हुकल्या..परंतु विद्रोह लिखाणाचा हुंकार कधी कमी झाला नाही. परिस्थिती नगण्य असतानाही शंकर अण्णा बोईनवाड यांनी कधी हार पत्करली नाही. उपाशीपोटी माणसाच्या हातून क्रांती होते असं  म्हणतात ते सत्य आहे. शंकर बोईनवाड यांनी दैनिक, साप्ताहिक, मासिक व नियतकालिकांतून समाजप्रबोधन पर लिखाण करून विकृत बुध्दीच्या लोकांवर प्रहार करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे

शंकर बोईनवाड  यांना बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागत असले तरी त्यांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य कधी कमी होत नाही.आपले दुःख कधीच दुसऱ्याला न सांगणारा मनमिळाऊ कधीच दुसऱ्याचे मन न दुखविणारा सखा म्हणजे शंकर बोईनवाड.बोईनवाड हे उच्च शिक्षित असल्याने शिक्षणाचे महत्व त्यांना कळाले आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही, शिक्षणाशिवाय माणसाचा उध्दार होत नाही

शिक्षणाच्या नवनवीन कल्पना मांडता याव्यात म्हणून शालेय संकल्प या वृत्तपत्राची निर्मिती करून शैक्षणिक क्षेत्रातील काम करणाऱ्या त्यांच्या कार्या विषयी स्तंभ लेखन करून त्यांना प्रेरणा देण्याचे काम शंकर अण्णा बोईनवाड करीत आहेत. त्यांच्या हातून असेच शैक्षणिक, सामाजिक कार्य घडो.त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने लोकवैभव परिवाराकडून कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा.

 ::::   गिरीधर गायकवाड देवणी जि.लातूर ::::

Post a Comment

0 Comments