Header Ads Widget

धर्माबादच्या कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भावी आमदार प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची आढावा बैठक संपन्न

            माधव पवार
नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र भावी आमदार प्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली धर्माबादच्या कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या आढावा बैठकीत विशेष चर्चा करण्यात आली आहे

आगामी काळातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला अधिकच मजबूत करण्यासाठी व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे हात बळकट करण्यासाठी प्रा. रवींद्र उर्फ बंडू पाटील यांच्या नेतृत्वाखाली धर्माबाद येथे आयोजित करण्यात आलेली सदरची विशेष बैठक संपन्न करण्यात आली आहे 

येत्या आगामी काळातील लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुका आणि त्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीच्या पूर्व तयारीसाठी सदरची विशेष आढावा बैठक घेण्यात आली होती

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे काँग्रेस पक्षाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव प्राध्यापक रवींद्र उर्फ बडू पाटील चव्हाण यांच्या काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकी दरम्यान कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा मा. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १ जुलै व २ जुलै २०२३ रोजी नांदेड लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत येणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नांदेड येथील आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन माजी आमदार पुत्र तथा भावी आमदार रवींद्र पाटील चव्हाण यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना केले आहे 

Post a Comment

0 Comments