नायगाव तालुक्यातील मौजे मांजरम येथे दिनांक १५ जुन २०२३ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचने नुसार राज्यात प्रशासन आपल्या दारी मोहिमे अंतर्गत सदरची मोहीम प्रभावी राबविण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे
शासन आपल्या दारी या मोहिमेच्या अंतर्गत सर्व सामान्य माणसाला न्याय मिळावा जन सामान्य माणसांचे प्रश्न सुटावेत या हेतूने सदरचा कार्यक्रम राबविण्यात येत असताना प्रशासनातील कर्मचारीच या कार्यक्रमाला अनुपस्थिती दाखविल्यामुळे सदरील कार्यक्रमाचा चांगलाच फज्जा उडाला असल्याचा आरोप विश्वानाथ शिंदे यांनी केला आहे
नायगाव तालुक्यात प्रशासन आपल्या दारी ही मोहीम व जनजागृती प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत नसल्यामुळे सदरच्या मोहिमेचा प्रजाच उडत राहणार की काय असाही प्रश्न जनसामान्य माणसाला पडला असून प्रशासन आपल्या दारी या कार्यक्रमात संबंधित अधिकारी उपस्थित का ? नव्हते असा प्रश्न गावकऱ्यांनी तहसीलदार यांना विचारले होते असे सांगण्यात येते आहे
सदरील कार्यक्रमात प्रशासकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे सदरचा कार्यक्रम पुन्हा एकदा जनजागृती करून लवकरात लवकर घेऊ असे सांगत तहसीलदार गजानन शिंदे यांनी या कार्यक्रमातुन निघून गेल्याचे ही सांगण्यात येत आहे
असले तरी तहसीलदार गजानन शिंदे यांच्या माध्यमातून व यांच्या आदेशाने सदरचे कर्मचारी शासन आपल्या दारी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी तहसीलदाराने सदरच्या अधिकाऱ्या व कर्मचाऱ्यांना सक्त आदेश द्यावेत असे ही सदरच्या जनतेतून बोलल्या जात आहे

0 Comments