Header Ads Widget

दरोडा सारख्या घटना लक्षात घेऊन नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावरील पेट्रोल पंप धारकांनी डिव्हायडरवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची गरज !!

         माधव पवार
नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर दरोड्या सारख्या घटना घडत असल्यामुळे या मार्गावरील सर्व पेट्रोल पंप धारकांनी महामार्गाच्या डिव्हायडरवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची गरज भासत असून एखादी गंभीर घटना या परिसरात घडल्यास सदरची घटना ही कॅमेरात  कैद असते असे जनतेतुन बोलल्या जात आहे 

सदरच्या आरोपीचा शोध घेण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांना सहजरीत्या आज्ञात आरोपीचा शोध घेता येतो यासाठी संबंधित पेट्रोल पंप धारकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची आवश्यकता भासत आहे 
जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या व नायगाव पोलीस ठाण्याच्या जवळपास एक ते दीड किलोमीटर अंतरावर दिनांक ३० मे २०२३ रोजी संध्याकाळी अंदाजे साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान एका कारला अडवून त्यांच्या कडील खाद्य तेलाची वसुली करून नांदेड कडे जाणाऱ्या सदरच्या कारला आज्ञात आरोपीने अडवून लुटले आहे

नायगावच्या तहसील कार्यालयाच्या पाटी जवळ आज्ञात दरोडेखोराने सदरच्या कारवर दरोडा टाकून ११ लाख ६२ हजार ३७३ रुपयाचा दरोडा टाकून आरोपी काही क्षणात फरार झाले आहेत 

तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दरोडा प्रकरणातील आज्ञात आरोपीला जेरबंद करण्यासाठी एलसीबीच्या पथकासह कुंटूर पोलिसांचं पथक तपासात जुटले असून सदरच्या अज्ञात दरोडेखोरांचा तपास लवकरच लागेल अशी अपेक्षा जनतेनी केली असल्याचे वास्तव चित्र ऐकावयास मिळत आहे

नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या पेट्रोल पंपाच्या समोरच्या रस्त्या वरील डिव्हायडरवर सीसीटीव्ही कॅमेरे बसण्याची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे 


Post a Comment

0 Comments