कुंटूरकराच्या कृष्णूर येथील जय भवानी विद्यालयाचा निकाल - ९१.१७ टक्के संस्थाचालक राजेश देशमुख कुंटूरकर यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक मठपती कडून विध्यार्थीचे अभिनंदन केले आहे
नायगाव तालुक्यातील कृष्णूर येथील जय भवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ९१.१७ टक्के लागला असून निकालाची परंपरा ही कायम असल्याचे शाळे मुख्याध्यापक मठपती यांनी सांगितले असून सदरील संस्था चालक राजेश देशमुख कुंटूरकर यांच्यासह मुख्याध्यापक मठपती यांनी उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थीचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे
तालुक्यातील कृष्णूरची जय भवानी विद्यालयातील शिक्षणाचा ही दर्जा सुधारला असल्यामुळे विध्यार्थीनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत शाळेला मोठे यश प्राप्त करून दिले असून या परीक्षेला एकूण विध्यार्थी ६८ बसले होते त्या पैकी ६२ विध्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत या मध्ये विशेष प्रविण्य ९ विध्यार्थी प्रथम श्रेणी ३१ विध्यार्थी द्वितीय २१ विध्यार्थी साधारण एक विध्यार्थी पास झाला असल्याची मुख्याध्यापक मठपती यांनी दिली आहे
कृष्णूरच्या जय भवानी शाळेतील सर्व प्रथम विध्यार्थी शिवाजी संभाजी जाधव यांना ८६ टक्के गुण मिळवून शाळेत पहिला आला तर द्वितीय सुप्रिया प्रकाश लंगोटे ८५ टक्के गुण मिळविली असून त्रितीय संतोश्री शिवाजी जाधव याने ८३ टक्के गुण घेऊन शाळेला यश प्राप्त करून दिल्यामुळे संस्थाचालक राजेश देशमुख कुंटूरकर यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक मठपती व गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि रुई बु चे निलेश भाऊसाहेब देशमुख यांनी सर्व विध्यार्थाचे अभिनंदन केले आहे

0 Comments