विद्यादीप एज्युकेशनल सोशल अँड कल्चरल (तेलुगु) सोसायटी नांदेड अंतर्गत नालंदा इंग्लिश मीडियम स्कूल सिडको नांदेड या विद्यालयाने शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा कायम ठेवली असून संस्थेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांचे कौतुक होत आहे.
मार्च २०२३ च्या एस.एस.सी. शाळांत परीक्षेमध्ये सदर विद्यालयातून ४० विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती त्यामधून सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यामध्ये विशेष प्राविण्यासह ९० टक्केच्या वर २० विद्यार्थी ८० टक्के च्यावर पंधरा विद्यार्थी ७० टक्केच्यावर २ विद्यार्थी तर ६० टक्केच्या वर ३ विद्यार्थी असा शंभर टक्के शाळेचा निकाल लागला आहे.
शाळेतून गुणाानुक्रमे प्रथम संदेश पवार ९७.८० टक्के द्वितीय विवेक मेटकर ९७. ४० % तर तृतीय रिया हंबर्डे ९६.६० टक्के गुण घेऊन यश संपादन केले आहे.
या सातत्यपूर्ण यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सौ. शेला पवार, संचालक श्री केशव गड्डम, श्रीकांत गड्डम सौ. दुर्गादेवी गड्डम, शाळेच्या मुख्याध्यापिका लता तम्मेवार, पिल्ले सर, प्रदीप पवार, सत्यनारायण शिवनी, राजकुमार पाटील मंगनाळे व सर्व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत

0 Comments