Header Ads Widget

नायगाव विधानसभा मतदारसंघात रस्त्याची विल्हेवाटपावसाच्या पहिल्याच पावसाने रस्त्यावर पाणी !!


नायगाव प्रतिनिधी : मधुकर जवळे :- 

नायगाव विधानसभा मतदारसंघात रस्त्याची विल्हेवाट लागली असल्यामुळे पावसाच्या पहिल्याच पावसाने रस्त्यावर पाणी दिसत असल्याने वहान धारकांना कमालीची कसरत करावी लागत असल्याचे चित्र बरबडा ते पाटोदा रस्त्यावर दिसून येत आहे

नायगाव विधानसभा मतदार संघात आमदार राजेश पवार यांनी निधीचा महापूर आणला परंतु आखा उन्हाळा संपला तरी ग्रामीण भागात कुठेच कामे चालू झालेले दिसले नाहीत आता पावसाळ्यात कामे कसे चालू होतील असा प्रश्न चर्चेला जात आहे

या मतदार संघासाठी आलेला कोठ्या वधी रुपयाच्या निधीचे काम कधी चालू होणार असा प्रश्न चर्चेला जात असला तरी आलेल्या निधीचा विकास झाला पाहिजे हा जनतेचा मुळ हेतू असून अगोदर निधी अभावी रस्ते खोंळबले तर आता निधी येऊन रस्ते बेवारस बनले आहेत

आमदार राजेश पवार यांनी आणलेला निधी योग्य पद्धतीने वापरण्यात यावा असे जनतेचे मत असले सदरच्या रस्त्याचे कामे लवकर पावसाळ्यात तरी चालू करण्यात यावे असी मागणी जनतेतून केली जात आहे 

Post a Comment

0 Comments