Header Ads Widget

महाराष्ट्राची लाडकी मराठी अभिनेत्री आशु सुरपूर कलर्स मराठी कस्तुरी मालिकेच्या भूमिकेत चमकणार



माधव पवार / रामप्रसाद चन्नावार  :-

महाराष्ट्राची लाडकी मराठी अभिनेत्री आशु सुरपूर ही दिनांक २६ जुन २०२३  पासून रात्री साडे दहा वाजता नव्याने सुरू होत असलेल्या कस्तुरी या मालिके मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री आशु सुरपूर ही एका महत्त्वाच्या भूमिका मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे

या मालिकेमध्ये तिच्यासोबत शिल्पा कुलकर्णी यांची भूमिका असून या मालिकेचे दिग्दर्शक श्री दीपक नलावडे आहेत

मराठी अभिनेत्री ही अनेक  चित्रपटांमध्ये आपण तिला पाहिलेले असलो तरी या मालिकेच्या निमित्ताने गप्पा मारत असताना आपण स्वकष्टाने आज पर्यंत जवळपास वीस मालिकां मध्ये ही अभिनयाचा प्रवास पूर्ण केल्याचे अभिनेत्री आशु सुरपूर ह्या नायागांव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितल्या आहेत

१९ कोविडच्या कालावधी मध्ये अचानक झालेल्या आईच्या निधनामुळे ती पूर्ण खचून गेली होती इंडस्ट्रीमध्ये पुन्हा आगमन करण्यासाठी कस्तुरी मालिकेचे कार्यकारी निर्माते सुनील कुलकर्णी यांनी दिलेली संधी तिने स्वीकारली त्या बद्दल ती त्यांचे आभार व कौतुक केले आहे

" सुरुवात छोटी असली तरी किर्ती मात्र मोठी असल्याचा अभिमान महाराष्ट्रातील तमाम चाहत्यांना वाटत असून सदरच्या महान होण्यासाठी सुरुवात करणे काळाची गरज असते "असे मत ही मराठी अभिनेत्री आशु सुरपूर यांनी व्यक्त केली आशु सुरपूर हिने तिच्या महाराष्ट्रातील तमाम चाहत्या प्रेक्षकांना ही मालिका बघण्याचे आवाहन केले तर तिचे चाहते तिच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत 

Post a Comment

0 Comments