नायगाव तालुक्यातील रुई बु येथील श्रीक्षेत्र सिद्ध सिद्धेशर पंढरपूर येथील संत हरिओम बाबा यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने काल्याच्या कीर्तनात भक्तांना संदेश दिला आहेरुई बु येथे आयोजित करण्यात आलेल्या काल्याच्या कीर्तनात प्रसिद्ध कीर्तनकार किशन महाराज बरबडेकर महाराज म्हणाले की सिदोरीचा केला काला भक्तांनो परमेश्वराच्या भक्तीला मात्र विसरूनका असा संदेश दिला आहे
तालुक्यातील श्रीक्षेत्र सिद्ध सिद्धेशर पंढरपूर रुई बु येथे दिनांक ३० जुन २०२३ रोजी काल्याच्या कीर्तन सोहळ्याच्या निमित्ताने रुई बु येथील सरपंच प्रतिनिधी निलेश भाऊसाहेब देशमुख यांच्या वतीने अन्नदानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पुरुष भक्त मंडळी व महिला भक्तगण मोठया संख्येने उपस्थित होते सुंदर अशा कीर्तन सोहळ्या बरोबर स्वादिष्ट भोजनाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला आहे
रुई बु येथील श्रीक्षेत्र सिद्ध सिद्धेशर पंढरपूर आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन सोहळ्यात प्रसिद्ध कीर्तनकार किशन महाराज बरबडेकर म्हणाले की भक्तानो श्रीकृष्ण व गौळणीचे प्रेम अतिशय चांगल्या प्रकारे होते त्याच प्रमाणे भक्तांनी सुद्धा परमेश्वरावर प्रेम करा असे सांगितले आहे
प्रसिद्ध कीर्तनकार किशन महाराज बरबडेकर म्हणाले की परमेश्वराच्या भक्ती शिवाय काहीच साध्या होऊ शकत नाही म्हणून सिदोरीचा केला काला " अन " परमेश्वराच्या भक्तीला भक्तानो विसरू नका असे कीर्तनकार किशन महाराज बरबडेकर यांनी सांगितले आहे

0 Comments