Header Ads Widget

पुढारी दुष्ठ असल्यास आम्हाला शत्रूची गरज नाही - प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांचे मत

       माधव पवार
राज्यातले सरकार हे महिला सक्ष्मीकरणाच्या बाबतीत बोलत नाही शिक्षणा बाबतीत चर्चा करत नाही आरक्षणाच्या बाबतीत मात्र ही चर्चा शिक्षणाच्या भोवती फिरत नाहीत केवळ आरक्षणाच्या मुद्यावर फिरत असते नेते व पुढारी जर दुष्ठव्रती असल्यास आम्हाला शत्रूची गरज नसल्याचे मत लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांनी व्यक्त केले आहे
लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामचंद्र भरांडे पुढे म्हणाले की शिक्षणाचा विषय भेडसावतो प्राथमिक शिक्षण महागाडे झाले बोर्डिंग नाहीत तर सुशिक्षित वर्ग व आडाणी वर्ग घेऊन आरक्षण वर्गीकरणाची लढाई लढत बसलो तर नेतृत्व कोणी करा परंतु कोणी जर राज्यात बेईमानी करत असेल दिशाभूल व फसवणूक होत असेल तर ते मात्र आम्ही होऊ देणार असे ठणकावूण प्रा. भरांडे यांनी सांगितले आहे

राज्यातील राजकीय नेत्याचा फक्त पदावर डोळा असून कोणते का पद असेना परंतु पद असले पाहिजे असा त्यांचा डोळा असल्यामुळे इतर समाजाच काय ? असा प्रश्न उपस्थित करत प्रा. रामचंद्र भरांडे पुढे म्हणाले की आज घडीला शिक्षणाची मोठया प्रमाणात गरज असून शिक्षणा शिवाय पर्याय नाही एखादा कार्यकर्ता समजासाठी हितासाठी मरण पथकारला पाहिजे असे त्यांनी म्हणाले आहे 
महाराष्ट्रातला डॉ बाबासाहेबाच्या महात्मा फुलेच्या शाहू महाराजांच्या बलिदानामुळे आज आम्ही सामाजिक न्यायाची लढाई लढू शकतो असे प्रा. रामचंद्र भरांडे म्हणाले ते पुढे म्हणाले की आम्ही आज पर्यंत दुष्मनावर  विश्वास टाकत आलो राज्यात दिशाभूल करणाऱ्याची संख्या जास्त झाली आहे

महाराष्ट्रातील साहित्यिकानो विचारवंतानो लेखकानो विध्यार्थानो बुद्धी जीवी लोकांनो शाहू फुले बाबासाहेब यांच्या वैचारिक विचाराला पुढे घेऊन जाण्यासाठी काळाची गरज असल्याचे मत ही प्रा. भरांडे यांनी व्यक्त केले आहे

Post a Comment

0 Comments